Skin Care Tips : 'हे' ३ पदार्थ वापरून बनवा बीटरूट फेस पॅक, चेहऱ्यावर दिसेल गुलाबी चमक

Shreya Maskar

फेस पॅक

तुम्हाला वारंवार ब्युटी पार्लरमध्ये पैसे वाया घालवायचे नसतील तर बीटरूट फेस पॅक चेहऱ्याला लावा. बीटरूटमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि लोह असते, जे त्वचेला नैसर्गिक गुलाबी चमक देतात.

Face Packs | yandex

बीटरूट फेस पॅक

बीटरूट फेस पॅक बनवण्यासाठी बीटाचा रस, संत्र्याची पावडर, गुलाबपाणी इत्यादी साहित्य लागते . हे सर्व एका बाऊलमध्ये मिक्स करून घट्टसर पेस्ट बन‌वा.

Face Packs | yandex

लावण्याची पद्धत

बीटरूट फेस पॅक चेहऱ्यावर लावून १५-२० मिनिटे ठेवून द्या. पेस्ट सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मॉइश्चराइज करा.

Face Packs | yandex

किती वेळा लावावा?

बीटरूट फेस पॅक आठवड्यातून तीन वेळा तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. तसेच तुम्ही बीटाची साल चेहऱ्यावर चोळा. यामुळे गुलाबासारखे तेज चेहऱ्याला येते.

beetroot | yandex

टॅनिंग कमी

सततच्या प्रवासामुळे टॅनिंगचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे त्वचा ‌‌खराब आणि निस्तेज बनते. या फेस पॅकमुळे चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळते. पिंपल्स कमी होतात.

Face Packs | yandex

डोळ्यांची त्वचा

डोळ्यांखाली काळी वर्तुळे कमी करण्यासाठी बीटरूट फेस पॅक रामबाण उपाय आहे. यामुळे डोळ्यांजवळची त्वचा अधिक मुलायम आणि मऊ होते.

Eye skin | yandex

कोरफड

तुम्ही यात कोरफडीचे जेल देखील टाकू शकता. कोरफडमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जे त्वचेची जळजळ कमी करते. तसेच उजळ बनवण्यास मदत करते.

Aloe vera | yandex

टीप

घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.

Skin Care | yandex

NEXT : एकही पैसा खर्च न करता घरीच बनवा फेसवॉश, तुमचा चेहरा आरशासारखा चमकेल

Homemade Face Wash | yandex
येथे क्लिक करा...