Shreya Maskar
घरगुती फेसवॉश बनवण्यासाठी बेसन, हळदी, चंदन पाउडर, मुलतानी माती, तांदळाचे पीठ इत्यादी साहित्य लागते.
एका बाऊलमध्ये बेसन, हळद, चंदन पावडर, मुलतानी माती, तांदळाचे पीठ सर्व मिक्स करा. यात थोडे गुलाबपाणी मिसळून एक पेस्ट बनवा.
जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही गुलाबपाणी ऐवजी दूध किंवा मध वापरू शकता. तुमच्या त्वचेनुसार प्रोडक्ट निवडा. तयार फेसवॉश चेहऱ्यावर १०-१५ मिनिटे राहू द्या, नंतर थंड पाण्याने धुवा.
बेसन त्वचेला खोलवर स्वच्छ करते. घाण, घाम आणि चेहऱ्यावरील जास्त तेल काढून टाकते. तसेच मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते.
हळदीचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मुरूम आणि पिंपल्स कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते. तसेच कायम हेल्दी राहते.
चंदन पावडर त्वचेला थंड करते. चेहऱ्यावरील जळजळ आणि लालसरपणा कमी करते. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यास मदत करते.
मुलतानी मातीमुळे चेहऱ्याचे छिद्रे साफ होते. तसेच चेहऱ्यावरील जास्त तेल नियंत्रित राहते. ज्यामुळे चेहरा तेलकट होत नाही. यामुळे त्वचेला खूप फायदा होतो.
तांदळाचे पीठ नैसर्गिकरित्या त्वचेला एक्सफोलिएट करते. टॅनिंग कमी करते आणि रंग सुधारण्यास मदत करते. त्यामुळे फेसवॉशमध्ये तांदळाचे पीठ आवर्जून टाका.
घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.