Rice Cooking Tips : भात खूपच चिकट होतो? एकदा ट्राय करा 'ही' ट्रिक, तांदळाचा प्रत्येक दाणा दिसेल वेगळा

Shreya Maskar

जेवण

भारतीय जेवणात भाताला विशेष महत्त्व आहे. डाळ-भात प्रत्येकांच्या घरी आवर्जून खाल्ला जातो. तसेच काही कार्यक्रम- समारंभांना बिर्याणी, पुलाव देखील बनवला जातो. भाताचे विविध प्रकार खायला चवदार लागतात.

Rice | yandex

भाताचे प्रकार

लोक अनेकदा तक्रार करतात की, भात एकतर कमी शिजलेले राहतो किंवा खूप चिकट होतात. त्यामुळे रेसिपीची चव बदलते. मात्र आज आपण परफेक्ट भात कसा शिजवावा, जाणून घेऊयात.

Rice | yandex

मोकळा भात

परफेक्ट मोकळा भात बनवण्याचे सीक्रेट केवळ पाण्याच्या प्रमाणातच नाही तर तांदूळ धुणे, भिजवणे आणि शिजवणे यासर्वांच्या तापमानात देखील आहे.

Rice | yandex

शेफने सांगितले सीक्रेट

मास्टर शेफ कुणाल कपूर यांनी सांगितलेल्या सिंपल ट्रिक वापरून तुम्ही मोकळा, फुललेला भात बनवू शकता. टिप्स आताच नोट करा.

Rice | yandex

प्रेशर कुकरचा वापर

तुम्ही तांदूळ प्रेशर कुकरमध्ये शिजवत असाल तर १ कप भातासाठी फक्त १ कप पाणी वापरा. ​​जर भांड्यात तांदूळ शिजवत असाल तर १ कप भातासाठी २ कप पाणी वापरा.

yandex

पहिली पद्धत

शिजवण्यापूर्वी तांदूळ किमान २०-३० मिनिटे स्वच्छ पाण्यात भिजवा. नंतर एका भांड्यात पाणी उकळवा त्यात मीठ आणि थोडे तेल मिक्स करून त्यात तांदूळ शिजवा.

Rice | yandex

दुसरी पद्धत

पॅनमध्ये पाणी उकळवा त्यात मीठ, तेल आणि तांदूळ घालून शिजवा. मात्र लक्षात घ्या, आधी भांड्यावर झाकण ठेवू नका, पाणी तांदळाच्या थरापर्यंत पोहोचेपर्यंत शिजवा. नंतर झाकण ठेवून १५ मिनिटे शिजवा.

Rice | yandex

लिंबाचा रस

तुम्हाला आवडत असेल तर, तांदूळ उकळत असताना लिंबाचा रस किंवा तूप घाला. लिंबू तांदूळ पांढरा आणि मऊ करेल आणि तूप तांदूळ मोकळा करले, तो चिकटणार नाही.

Lemon juice | yandex

NEXT : महागडे पार्लर विसरा; 'या' बियांपासून बनवा हेअर जेल, केस होतील मजबूत अन् चमकदार

Homemade Hair Gel | yandex
येथे क्लिक करा...