Homemade Hair Gel : महागडे पार्लर विसरा; 'या' बियांपासून बनवा हेअर जेल, केस होतील मजबूत अन् चमकदार

Shreya Maskar

जवसाच्या बिया

जवसाच्या बियांचे हेअर जेल केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते, टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढवते आणि केसांची वाढ वाढवते.

Flaxseeds

कोरफड जेल

तुमचे केस कोरडे असतील आणि तुम्हाला केल लांब आणि मऊ बनवायचे असतील, तर जवसाच्या बिया आणि कोरफडीचे जेल मिक्स करून केसांना लावा.

Aloe Vera Gel

हेअर जेल कसे बनवावे?

जवसाच्या बिया 2 कप पाण्यात उकळवा आणि त्यात कोरफडीचे जेल घालून चांगले मिक्स करा. आठवड्यातून एकदा केसांना हे जेल लावा जेणेकरून केस मऊ, मुलायम आणि निरोगी राहतील.

Hair Gel

नारळाचे तेल

1 चमचा नारळाचे तेल जवस आणि कोरफडीच्याजेलमध्ये पूर्णपणे मिसळा आणि केसांना लावा हेअर जेल केसांना खोलवर पोषण देते, चमक देते आणि केसांच्या वाढीस मदत करते. फक्त हे ५ मिनिटांच्यावर ठेवू नका, कारण त्यामुळे तुमचे केस जड वाटू शकतात.

Coconut Oil

व्हिटॅमिन ई कॅप्सूल

तुम्ही या जेलमध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल देखील टाकू शकता. व्हिटॅमिन ई मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे केस मजबूत करण्यास मदत करतात. तसेच लवकर तुटत नाही.

Vitamin E Capsules

रोजमेरी तेल

जवसाच्या बियांच्या जेलमध्ये अर्धा छोटा चमचा रोजमेरी तेल टाका आणि केसांना लावा. यामुळे टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या वाढीस मदत होते.

Rosemary Oil

फायदे

जवसाच्या बियांचे हेअर जेल सर्व प्रकारच्या केसांसाठी फायदेशीर आहे. केस धुण्यापूर्वी ते लावा. 5-10 मिनिटे तसेच राहू द्या, नंतर शॅम्पू आणि कंडिशनरने केस स्वच्छ धुवा.

Hair Gel

टीप

घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.

Hair Gel

NEXT : महागड्या क्रीम कशाला? 'हा' एक घरगुती उपाय करा, आठवड्याभरात डोळ्यांखालील Dark Circles होतील छुमंतर

Dark circles | yandex
येथे क्लिक करा...