Shreya Maskar
डोळ्यांखालील काळी वर्तुळे प्रामुख्याने अपुरी झोप, अनुवांशिकता, डिहायड्रेशन, वृद्धत्व आणि सतत स्क्रीन पाहणे या कारणांमुळे येतात.
डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी महागड्या क्रीम लावण्यापेक्षा घरगुती क्रीम बनवा. यामुळे फक्त १० रुपयांत तुमची डोळ्यांखालील त्वचा चमकू लागेल.
कोरफड क्रीम बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये हळद, खोबरेल तेल, कोरफडीचा गर, वॅसलिन टाकून स्मूथ पेस्ट बनवा.
ही क्रीम डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर लावून 15 ते 20 मिनिटांसाठी तसेच ठेवून द्या. त्यानंतर कोमट स्वच्छ पाण्याने डोळे धुवून घ्या.
तसेच तुम्ही इतर घरगुती पदार्थांनी देखील डोळ्यांखालील Dark Circles दूर करू शकतात. रात्री झोपताना डोळ्यांखाली साजूक तूप लावून झोपा. सकाळी त्वचा मऊ दिसेल आणि उजळेल.
हळदीमध्ये आयुर्वेदीय गुणधर्म आहे. एलोवेरा जेलमध्ये चिमूटभर हळद मिसळून डोळ्यांखाली लावल्याने त्वचेला उजळपणा येतो आणि सैलसर दिसणारी त्वचा घट्ट होण्यास मदत होते.
एलोवेरा जेल डोळ्यांखाली लावल्याने त्वचेतील रक्ताभिसरण वाढवते, ज्यामुळे काळसरपणा कमी होतो आणि त्वचा उजळू लागते. मध हा नैसर्गिक मॉइश्चरायझर मानला जातो. एलोवेरा जेलमध्ये मध मिसळून लावल्यास त्वचेतील ओलावा टिकून राहतो.
घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.