Shreya Maskar
यंदा 15 फेब्रुवारी 2026 (रविवारी) महाशिवरात्री आली आहे. महाशिवरात्रीला भक्त उपवास करून भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात. उपवासाला कोणत्या पदार्थ खावे आणि कोणते टाळावे, जाणून घेऊयात.
महाशिवरात्रीच्या उपवासाला पदार्थ खाताना विशेष लक्ष द्यावे. सहसा घरचे पदार्थ खा. तसेच खाण्याचे प्रमाण कमी ठेवा. जेणेकरून ॲसिडीटी होणार नाही. कोणते पदार्थ खावे, जाणून घेऊयात.
उपवासाला ताजी फळांचा आस्वाद घ्या. कारण यात फायबर खूप असते. ज्यामुळे पोट दिर्घकाळ भरलेले राहते. उदा. सफरचंद, केळी, संत्री, डाळिंब तुमच्या शरीराला ताकद देते.
उपवासाला घरीच सिंपल पद्धतीने थंडाई बनवून प्या. यामुळे पचनक्रिया सुधारते. यात भरपूर फळे आणि सुका मेवा मिसळा.
उपवासाला काही लोकांना खूप अशक्तपणा येतो, अशावेळी भरपूर ड्रायफ्रूट्स खा. यामुळे जास्त भूक लागत नाही. तसेच ड्रायफ्रूट्स भाजून खाऊ नका. कच्चेच खा.
महाशिवरात्रीच्या उपवासाला तळलेले पदार्थ खाणे टाळा. उदा साबुदाणा वडा, बटाट्याचे पदार्थ तळलेले पदार्थ खाल्ल्याने पचनासंबंधित समस्या निर्माण होतात. अपचन, बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.
उपवासाला बनवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये कांदा-लसूण टाकणे टाळा. तसेच उपवासाला सैंधव मीठाचा वापर करा.
आपण उपवासाला अनेक वेळा चहा-कॉफी पितो. जे की चुकीचे आहे. उपवासाला चहा-कॉफी पिणे टाळा. कारण यात कॅफिनचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे उलट्या, मळमळ, निद्रानाशा यांची समस्या उद्भवते.