Shreya Maskar
दुधी जीवनसत्त्वे, खनिजे, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, आणि अँटिऑक्सिडंट्स गुणधर्माने समृद्ध आहे. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होते. चेहरा अधिक सुंदर दिसतो.
दुधीच्या सालीचा फेसपॅक बनवण्यासाठी दुधीची साल काढून उन्हात आणि पंख्याखाली सुकवून घ्या. साल कोरडी झाली की, मिक्सरला त्याची पावडर बनवून घ्या.
दुधीच्या सालीच्या पावडरमध्ये गुलाबपाणी मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून १५ ते २० मिनिटांपर्यंत ठेवून द्या. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
दुधीमुळे त्वचेला नैसर्गिक पोषण मिळते. ज्यामुळे चेहरा चमकदार आणि त्वचा मऊ होते. चेहऱ्यावरील काळे, पिंपल्स कमी होण्यास मदत मिळते.
महिन्यातून चार-पास वेळा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावू शकता. ही पेस्ट हवा बंद डब्यात भरून स्टोर करा. २-३ दिवस पेस्ट चांगली फ्रिजमध्ये राहते.
दुधीच्या भाजीत पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. तसेच चेहऱ्यावरील सुरुकुत्या कमी होण्यास मदत होते. खूप वेळासाठी त्वचा ग्लो करते.
उन्हामुळे चेहरा काळवंडतो. तसेच रोजच्या मेकअपमुळे त्वचेला संसर्ग देखील होतो, ज्यामुळे त्वचेची जळजळ होते. अशावेळी दुधीच्या सालीचा फेसपॅक चेहऱ्याला लावा. चेहरा थंड होईल.
घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.