Shreya Maskar
चहा झाल्यानंतर उरलेली चहा पत्ती स्वच्छ पाण्याने धुवा आणि एका बाऊलमध्ये काढा. यात एक चमचा मध घाला आणि चांगली पेस्ट तयार करा.
तयार पेस्ट फक्त एक ते दीड मिनिटे चेहऱ्यावर चोळा आणि नंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. चहा पत्तीचा स्क्रब तुम्हाला निरोगी त्वचा देईल. लक्षात ठेवा 2 मिनिटांच्यावर ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवू नका.
चहा पत्तीचा स्क्रब त्वचेतील मृत पेशी प्रभावीपणे काढून टाकतो, ज्यामुळे त्वचा नितळ आणि उजळ होते. यातील अँटीऑक्सिडंट्स टॅनिंग, काळी वर्तुळे कमी करतात.
चहा पत्ती त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित ठेवते. तसेच अँटीबॅक्टेरियल गुण धर्मांमुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होते. चहाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि कॅफिन नैसर्गिकरित्या आढळतात
सततच्या प्रवासामुळे घाण, धूळ चेहऱ्याला लागते. ज्यामुळे त्वचेवर खाज, पुरळ येते, त्वचेची जळजळ होत. अशावेळी हे स्क्रब लावल्याने चेहऱ्याला कोणताही संसर्ग होत आहे.
चहा पत्तीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला अकाली वृद्धत्वापासून वाचवतात आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी करून तारुण्या टिकवून ठेवतात.
चहा पत्तीतील पोषक घटक त्वचेला हायड्रेट करतात, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. महिन्यातून दोन - तीन वेळा तुम्ही हे स्क्रब चेहऱ्याला लावू शकता.
घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.