Shreya Maskar
ओट्स हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यात ओट्समुळे चेहरा मॉइश्चरायझ, क्लिंजिंग करता येतो. तसेच ओट्समधील बीटा-ग्लुकन्स , अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे त्वचेची जळजळ कमी करतात, कोलेजन उत्पादन वाढवून त्वचा तरुण व चमकदार बनवण्यास मदत करतात.
ओट्स फेस पॅक बनवण्यासाठी सर्वात आधी बाऊलमध्ये ॲव्होकाडो बारीक करा, त्यानंतर त्यात ओट्स टाकून एकजीव करून घ्या.
त्यानंतर यात काही थेंब गुलाबपाणी टाका. पेस्ट थोडी थंड झाली की, चेहऱ्यावर लावा. १५ ते २० मिनिटे हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून ठेवा.
चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर मॉइश्चरायझर लावा. लक्षात ठेवा फेस पॅक लावल्यावर लगेच उन्हात जाऊ नका.
ओट्स फेस पॅक आठवड्यातून एक ते दोन वेळा तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. तसेच त्यानंतर बर्फ देखील चेहऱ्यावर चोळा.
ॲव्होकाडो हे जीवनसत्त्वे , निरोगी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध असल्याने त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे त्वचेला सखोल हायड्रेशन देते, अकाली वृद्धत्व रोखते, मुरुम कमी करण्यास मदत करते आणि त्वचा चमकदार व लवचिक बनवते.
गुलाबपाणी त्वचेसाठी एक नैसर्गिक टोनर आणि क्लिन्झर म्हणून काम करते. हे त्वचा हायड्रेट करते, PH पातळी संतुलित राखते आणि जळजळ कमी करते.
घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.