Shreya Maskar
घरगुती फेस पॅक बनवण्यासाठी मिल्क क्रीम, बेसन, गुलाबपाणी , कच्चे दूध इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात कोरफड देखील टाकू शकता.
एका बाऊलमध्ये मिल्क क्रीम , बेसन मिक्स करा. त्यात थोडे गुलाबपाणी आणि कच्चे दूध घालून गुळगुळीत पेस्ट बनवा.
तयार पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर १५-२० मिनिटे लावून चांगले सुकू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा.
बेसन टॅनिंग आणि मृत त्वचा काढून टाकते. मिल्क क्रीम कोरड्या त्वचेला पोषण देते आणि चेहरा मॉइश्चराइज करते.
चेहऱ्यावरील काळे डाग, डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास हा फेस पॅक मदत करतो.
बेसनचा घरगुती फेस पॅक आठवड्यातून दोनदा वापरू शकता, परंतु ज्यांची तेलकट त्वचा आहे, त्यांनी आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा लावणे टाळा.
तुम्हाला वारंवार पिंपल्स येत असतील तर चेहऱ्याला न चुकता हा फेस पॅक लावा. यामुळे चेहरा नैसर्गिकरित्या ग्लो करेल.
घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.