Saree Fashion : पहिल्यांदाच साडी नेसताय? मग कोणत्या साडीवर कोणता ब्लाउज सुंदर दिसेल, जाणून घ्या

Shreya Maskar

साडी

साडीची फॅब्रिक, रंग आणि प्रसंगानुसार योग्य ब्लाउज निवडल्यास आकर्षक लूक मिळतो. लहान उंची असल्यास हाय कॉलर किंवा बोट नेक, तर मानेच्या आकारासाठी व्ही-नेक किंवा डीप यू-नेक ब्लाउज निवडता येतील.

Saree- Blouse Combination | pinterest

साडी - ब्लाउज

सिल्क साड्यांवर ब्रोकॅड, मखमली किंवा एम्ब्रोइडरी ब्लाउज, तर कॉटन साड्यांवर कॉन्ट्रास्ट किंवा कॉटनचेच ब्लाउज छान दिसतात. प्लेन साड्यांवर भरजरी/डिझायनर आणि भारी साड्यांवर साधे, पण मोहक ब्लाउज निवडावेत.

Saree- Blouse Combination | pinterest

ब्लाउजचे प्रकार

कट-स्लीव्ह ब्लाउज खूप स्टायलिश आणि एलिगंट लूक देतात. पार्टी वेअर साडीवर कट-स्लीव्ह ब्लाउज बेस्ट ऑप्शन आहे. रफ लाइन ब्लाउज किंवा ओव्हरलॅप ब्लाउज शिफॉनच्या साडीवर बेस्ट आहे.

Saree- Blouse Combination | pinterest

स्लीव्हलेस किंवा नेट डिझाइन

आजकाल स्लीव्हलेस किंवा नेट डिझाइन ब्लाउज ट्रेंडिंगमध्ये पाहायला मिळतात. बाजारात विविध स्टाइलचे ब्लाउज उपलब्ध आहेत. हे ब्लाउज वेस्टन आणि पारंपरिक दोन्ही लूकवर सुंदर दिसतात.

Saree- Blouse Combination | pinterest

ब्लाउज डिझाइन्स

ऑफ शोल्डर ब्लाउजमध्ये तुमचा लूक अधिक गॅमरस दिसतो. साडीच्या रंगाला कॉन्ट्रास्ट असा ऑफ शोल्डर ब्लाउज निवडा. कोल्ड शोल्डर ब्लाउजची रचना ऑफ शोल्डर ब्लाउजसारखीच आहे, त्यात आणखी एक डिझायनर पट्टी जोडली असते.

Saree- Blouse Combination | instagram

बॅक-लेस ब्लाउज

बॅक-लेस ब्लाउज तर तुमच्या सौंदर्याला चार चाँद लावते. तुम्ही एखाद्या पार्टी किंवा रिसेप्शनला जात असाल तर बॅक-लेस ब्लाउज बेस्ट ऑप्शन आहे.

Saree- Blouse Combination | pinterest

रंगसंगती

काळा, पांढरा, सोनेरी, चांदीचा रंगाचा ब्लाउज जवळजवळ सर्वच रंगांच्या साड्यांवर मॅच होतो. प्लेन साडीवर प्रिंटेड, आरशाचे काम किंवा हेवी वर्क असलेला ब्लाउज उठावदार दिसतो.

Saree- Blouse Combination | pinterest

कॅज्युअल वेअर

ऑफिस, कॅज्युअल वेअरसाठी कॉटन साड्यांवर लिनन किंवा कॉटनचेच कॉन्ट्रास्ट रंगाचे साधे ब्लाउज चांगले दिसतात. पार्टी वेअरसाठी साड्यांवर सिक्विन , मखमली किंवा स्लीव्हलेस ब्लाउज आधुनिक लूक देतात

Saree- Blouse Combination | pinterest

NEXT : Valentine's Day ला चेहरा चंद्रासारखा चमकेल; घरीच बनवा २ मिनिटांत 'हा' फेस पॅक, बॉयफ्रेंड तुमच्याकडे पाहतच राहील

Valentine's Day | yandex
येथे क्लिक करा...