Ration Card Update: गॅस टंचाईत दिलासा! रॉकेल वाटप सुरू होणार? रेशनकार्ड लवकर अपडेट करा नाहीतर...; घरबसल्या करा प्रोसेस

LPG Shortage India: महाराष्ट्रात गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर रॉकेल वाटप सुरू होणार आहे. मात्र त्यासाठी रेशन कार्ड अपडेट, आधार लिंक आणि माहिती दुरुस्ती अनिवार्य असून नागरिकांनी लवकर प्रक्रिया पूर्ण करावी.
LPG Shortage India
Ration Card Updategoogle
Published On

सध्या गॅस सिलेंडरच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यात LPG गॅसच्या किंमतीतही वाढ करण्यात आली आहे. इराण विरुद्ध इस्त्रायल, अमेरिका युद्धामुळे या गॅस टंचाईला सर्वसामान्यांना सामोरं जावं लागतंय. त्यात पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारने रॉकेल वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याची अट किंवा नियम असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचे रेशन कार्ड अपडेट करावे लागणार आहे. पुढील बातमीत आपण याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्ही घरबसल्या ही रेशनकार्ड अपडेट करुन रॉकेलचा लाभ घेऊ शकता.

केंद्र सरकारने मार्च-एप्रिल 2026 या कालावधीसाठी महाराष्ट्राला 37 लाख 44 हजार लिटर रॉकेलचा कोटा मंजूर केला आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक रेशन कार्डधारकाला 3 लिटर रॉकेल देण्यात येणार आहे. तसेच ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही त्यांनाही प्राधान्य दिले जाणार आहे. हे रॉकेल नागरिकांना त्यांच्या जवळच्या रेशन दुकानातून उपलब्ध होईल. सरकारकडून रॉकेलचे वितरण ई-पॉस मशीन आणि आधार आधारित बायोमेट्रिक प्रणालीद्वारे केले जाणार आहे. त्यामुळे रेशन कार्डमध्ये कोणतीही चूक असेल तर रॉकेलचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

LPG Shortage India
Kumbha Rashi: कुंभ राशी असणाऱ्या व्यक्तींचा आजचा दिवस कसा असणार? वाचा खास राशीभविष्य

जर कुटुंबातली सदस्यांचे आधार कार्ड लिंक नसेल, मोबाईल नंबर अपडेट नसेल किंवा सदस्यांच्या माहितीत काही चुका असतील तर या समस्या लगेचच दुरुस्त करणं गरजेचं आहे. नागरिकांना घरबसल्या रेशन कार्ड अपडेट करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी Maharashtra Food Department च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करून माहिती अपडेट करता येते. तसेच UMANG ॲपच्या मदतीनेही 'मेरा रेशन' विभागातून माहिती बदलता येते.

याची ऑनलाईन प्रक्रिया सोपी आहे. त्यासाठी अधिकृत पोर्टलवर जाऊन लॉग इन करा मग Apply/Edit Ration Card हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर आधार लिंकिंग, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज केल्यानंतर मिळणाऱ्या अ‍ॅक्नॉलेजमेंट नंबरच्या मदतीने अर्जाची स्थिती तपासता येते. ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया करता येत नाही, त्यांनी जवळच्या तहसील कार्यालयात किंवा पुरवठा विभागात जाऊन अर्ज सादर करून रेशन कार्ड अपडेट करता येते. सरकारच्या या निर्णयामुळे गॅस टंचाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरात लवकर रेशन कार्ड अपडेट केल्याने तुम्हाला या योजनेचा लाभ सहज घेता येईल.

LPG Shortage India
ट्रिपल रियर कॅमेरा अन् 5000mAh बॅटरी, Samsungने लॉन्च केले 2 बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, तुमच्यासाठी कोणता बेस्ट? वाचा किंमत अन् फीचर्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com