

रेशन कार्डच्या नियमात महत्त्वाचा बदल
१ एप्रिलपासून नवे नियम लागू
७० लाख रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता
रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेशन कार्डच्या नियमात महत्त्वाचे बदल होणार आहे. १ एप्रिल २०२६ पासून रेशन कार्डचे नियम बदलणार आहेत. यामध्ये लाखो रेशन कार्डधारकांचे रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अनेक लाभार्थ्यांचे नावदेखील काढून टाकले जाणार आहे.
नवीन नियमांनुसार, रेशन कार्डची पात्रता आणि निकष अजूनच कडक करण्यात आले आहेत. याद्वारे फक्त निकषात बसणाऱ्या रेशन कार्डधारकांनाच मोफत धान्य मिळणार आहे.
७० लाख रेशन कार्ड रद्द होणार
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने रेशन कार्डबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये पारदर्शकता वाढवण्यात आली आहे. गरजू व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ज्या व्यक्ती निकषात बसत नाही, ज्यांचे उत्पन्न जास्त आहे अशा व्यक्तींचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे.
रेशन कार्डच्या नवीन नियमानुसार शहरी भागासाठी उत्पन्नाची मर्यादा ३ लाख निश्चित करण्यात आली आहे. तर ग्रामीण भागासाठी २ लाखांची मर्यादा आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला रेशन कार्डचा लाभ घेता येणार नाही.
ज्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे. १०० चौरस मीटरपेक्षा जास्त प्लॉट, प्लॅट किंवा स्वतःचे घर असेल तर तुम्ही अपात्र आहात. घरातील कोणतीही व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यांचे रेशन कार्ड बंद होणार आहे, घरात एसी किंवा जनरेटर असेल तर तुमचेही रेशन कार्ड रद्द केले जाऊ शकते.
हे काम करणे गरजेचे
जर तुम्ही चुकीची माहिती देऊन रेशन कार्ड वापरत असाल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होई शकते. या रेशन कार्डधारकांना खरी कागदपत्रे जमा करायची आहे. याचसोबत केवायसी करणेही अनिवार्य आहे. केवायसी न केल्यास रेशन कार्ड बंद केले जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.