Maharashtra Live News Update : शिवभक्तांचे वाहन उलटले; एक ठार, १७ जण जखमी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६, आज महाशिवरात्री, राज्यातील राजकीय घडामोडी, हवामान अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

शिवभक्तांचे वाहन उलटले; एक ठार, १७ जण जखमी

महाशिवरात्रीनिमित्त दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात होऊन एक ठार, तर सतरा भक्त जखमी झाले. हा अपघात चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील पाटाळा गावाजवळ झाला. जखमींपैकी गंभीर १२ जण चंद्रपूरला, तर ५ जण वरोरा इथे हलवण्यात आले.

बीडच्या परळीत पप्पी घेणारा सोन्या आणि मोन्या चर्चेत

परळीतील महापशुधन एक्सपोमध्ये सध्या एका खास बैलजोडीची जोरदार चर्चा रंगली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित या प्रदर्शनाचा आज तिसरा दिवस असून काजळी खिलार जातीचे सोन्या आणि मोन्या हे बैल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

महाशिवरात्रीला मतभेद विसरून विकासासाठी एकत्र येण्याचे धनंजय मुंडेंचे आवाहन

बीड येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मतभेद बाजूला ठेवून बीडच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी प्रभू वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी राज्यातील जनतेचे जीवन सुखी, समाधानी व समृद्ध राहावे यासाठी महादेवाकडे प्रार्थना केली. बीडच्या विकासासाठी राजकारणापेक्षा जनहित महत्त्वाचे असून सर्वांनी समन्वयाने काम केल्यास जिल्हा नक्कीच प्रगतीपथावर जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या भूमिकेचे नागरिकांमधून स्वागत होत असून महाशिवरात्रीच्या निमित्ताने दिलेला एकतेचा संदेश महत्त्वाचा मानला जात आहे.

ईशान किशन 77 धावांवर क्लीन बोल्ड

टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील बहुचर्चित सामना आज दिल्ली येथे सुरू झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या लढतीत पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने फलंदाजीला सुरुवात करताना सावध पण आक्रमक खेळ केला. सलामीवीर ईशान किशन याने उत्कृष्ट फॉर्म दाखवत 77 धावांची झुंजार खेळी केली. मात्र, पाकिस्तानच्या गोलंदाजाने त्याला क्लीन बोल्ड करत भारतीय संघाला पहिला मोठा धक्का दिला.

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये ईशान किशनचे अर्धशतक

टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील बहुप्रतिक्षित सामना आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू झाला आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉसनंतर भारतीय संघाने फलंदाजीला सुरुवात केली. सलामीला उतरलेल्या फलंदाजांनी सावध पण आक्रमक खेळ करत धावसंख्या वाढवली. दरम्यान, ईशान किशन याने शानदार फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या आक्रमक फटकेबाजीमुळे भारतीय डावाला चांगली गती मिळाली. स्टेडियममध्ये प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून सामना चुरशीचा होत असल्याचे चित्र आहे.

अमरावतीत सोने व्यावसायिकावर दरोडा; ७ आरोपी अटकेत, १ कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती शहरातील कठोरा नाका परिसरात शुक्रवारी रात्री सोने व्यावसायिकाला लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुचाकीवरून जात असताना अज्ञात आरोपींनी त्याचा पाठलाग करून सोने व रोख रक्कम लुटली होती. या प्रकरणी अमरावती शहर गुन्हे शाखेने वेगवान तपास करत केवळ ४८ तासांत मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सात आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लुटीत वापरलेली दुचाकी, रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.

टी-20 वर्ल्ड कप 2026मध्ये पाकिस्तानचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय

टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सामन्याला आज सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान क्रिकेट संघ आमनेसामने आले असून क्रिकेटप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेडियममध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी असून दोन्ही संघांच्या चाहत्यांकडून जोरदार जल्लोष सुरू आहे.

भारत–पाक संघ स्टेडियम परिसरात दाखल; सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त

टी-20 वर्ल्ड कप 2026च्या बहुप्रतिक्षित सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान क्रिकेट संघ आज स्टेडियम परिसरात दाखल झाले. दोन्ही संघांचे आगमन होताच परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संघाच्या बस स्टेडियममध्ये प्रवेश करताच चाहत्यांनी जल्लोष केला.

विदर्भाची काशी देव मार्कंडा येथे महाशिवरात्री निमित्त लाखो भाविकांची गर्दी

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देव मार्कंडा येथे आज हर हर महादेवाच्या गजरात लाखो भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या. उत्तरवाहिनी असलेल्या नदीत पवित्र स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस प्रशासन सज्ज असून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडूनही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहेत. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र येथून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. यात्रेनिमित्त दुकाने, आकाशी झुले, सर्कस व ‘मौत का कुआं’ अशी आकर्षणे भाविकांचे लक्ष वेधत असून यंदाही जत्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे.

भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पुण्यातील भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करू नयेत, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. आज दुपारी भाजपकडून काँग्रेस भवन येथे आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन काही काळासाठी हिंसक वळणावर गेले, त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलीस सतर्क झाले आहेत. भाजप कार्यालय परिसरात अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून ये-जा करणाऱ्यांवरही लक्ष ठेवले जात आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना नकोच - आसिफ शेख

पाकिस्तान आपल्या देशावर वारंवार हल्ले करतोय देशात दहशतवादी कारवाया करतो अश्या स्थितीत त्यांच्याशी क्रिकेट सामना खेळलाच नाही पाहिजे.भाजपची जीव दिला पाहिजे.आयपीएल व क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून करोडो रुपयांचा व्यवसाय सुरू आहे.त्यांना देशप्रेम वगैरे याच्याशी काही देणेघेणे नाही अशी परखड मत इस्लाम पार्टीचे संस्थापक माजी आमदार आसिफ शेख यांनी आज होत असलेल्या भारत क्रिकेट सामन्याबाबत व्यक्त केले.

महाडमधील नडगाव मध्ये भंगारच्या दुकानाला भीषण आग

महाडमधील नडगाव मध्ये भंगारच्या दुकानाला भीषण आग

आगीमध्ये भंगारच गोदाम जळून खाक

फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी दाखल

डोंबिवलीत नाल्यातून रासायनिक हिरवे पाणी रस्त्यावर

डोंबिवली MIDC पिंपळेश्वर मंदिर रस्त्याच्या लगतच्या नाल्यातून रासायनिक हिरवे पाणी रस्त्यावर

MIDC चे दुर्लक्ष

कारवाई कधी

जुन्नर तालुक्यातील कबाडवाडी येथे जमिनीच्या वादातून कुटुंबियांमध्ये मारहाण

बहिणीच्या जमिनीच्या ताब्यावरून हा वाद झाल्याचं प्रकरण समोर येत असून भावाच्या घरातील कुटुंबीय आणि बहिणीच्या घरातील कुटुंबीय एकमेकांच्या विरोधात भिडलेले पाहायला मिळत आहे,जमिनीचे बाजार भाव सध्या गगनाला भिडल्याने भाऊ बहिणीच्या नात्यातील ही कतुटा समोर आलेली पाहायला मिळतीय.हा वाद एवढा टोकाला गेला की अखेर या दोन्ही कुटुंबीयांना शांत करण्यासाठी जुन्नर पोलिसांना घटनास्थळी जाऊन मध्यस्थी करत शांत करावं लागलं

पालघरच्या एमआयडीसीमध्ये कंपनीला भीषण आग

पालघरच्या एमआयडीसी मध्ये कंपनीला भीषण आग. गणेश नगर येथील परफेक्ट कंटेनर कंपनीला भीषण. संपूर्ण परिसरात धुरांचे लोट. आगीचं कारण अस्पष्ट. सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी दाखल. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. कंपनीच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीच वातावरण.

महाशिवरात्री निमित्त प्रकाश येथील केदारेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तापी काठावरील प्रकाशा नगरीत भाविकांचा जनसागर लोटलाआ हे येथील ऐतिहासिक आणि प्राचीन केदारेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. तापी नदीत पवित्र स्नान करून भाविक महादेव चरणी लीन झाले. या उत्सवाचे औचित्य साधून परिसरात भक्तीसोबतच सेवाभावाचे दर्शन घडले. विविध सामाजिक संस्थांच्या वतीने भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच, ओम शांती परिवारातर्फे विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या तीर्थक्षेत्री प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे..

पुण्याच्या महापौर यांच्यावर गुन्हा दाखल करा, काँग्रेसची मागणी

पुण्याच्या महापौर यांच्यावर गुन्हा दाखल करा, काँग्रेस ची मागणी

आंदोलनाच्या वेळी पोलिसांवर सुद्धा दबाव होता, काँग्रेसचा आरोप

काँग्रेस नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यांचा फरासखाना, विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या बाहेर ठिय्या

जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार

काँग्रेस आमदाराच्या घरावर भाजपाचा मोर्चा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान सोबत केल्याप्रकरणी यवतमाळ शहरात भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या निवासस्थानावर धडक मोर्चा काढला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सापकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत बॅनर ला चपला जोडे मारून निषेध करण्यात आला. पोलिसांना ढकलून आमदारांच्या निवासस्थानी शिरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना रोखून धरले.

चिपळूण मध्ये पक्षविरोधी काम करणाऱ्या बड्या पदाधिकाऱ्यांना भाजपचा दणका

चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे आणि शहरप्रमुख परिमल भोसले यांच्यासह आणखी एकाची पक्षातून हकालपट्टी

नगरपरिषद निवडणुकीत पक्षाच्या विरुद्ध काम करणे भोवले... जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांची सुरेखा खेराडे आणि परिमल भोसले यांच्यावर थेट कारवाई.

Ambernath: महाशिवरात्रीनिमित्त खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ येथील शिवमंदिरात केली पूजा

अंबरनाथ -

महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथ येथील ऐतिहासिक शिवमंदिरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भेट देत भोलेनाथाचे दर्शन घेतले.

पहाटेच्या सुमारास त्यांनी मंदिरात विधिवत पूजा, अभिषेक व आरतीत सहभाग घेतला.

यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधत त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धी, आरोग्य व शांततेसाठी प्रार्थना केली.

महाशिवरात्रीच्या पावन पर्वामुळे मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. संपूर्ण वातावरण ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेले होते.

प्रशासनाकडूनही सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली होती.

Manmad: मनमाडमध्ये आजपासून उत्तर महाराष्ट्राचे पहिल्या विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

मनमाड -

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरीत आजपासून विद्रोही सांस्कृतीक चळवळ आणि महाराष्ट्र राज्य आयोजित उत्तर महाराष्ट्राचे पहिले विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत असून ग्रंथदिंडी ची शोभा यात्रा काढून साहित्य संमेलनाची सुरुवात करण्यात आली.संमेलनात नाशिक,जळगाव,धुळे, संभाजीनगर,अहिल्यानगर यासह इतर भागातून मोठ्या प्रमाणात साहित्यीक, कवी, लेखक सहभागी झाले आहे

Pune: पुण्यात भाजप-काँग्रेस आमनेसामने, आंदोलनादरम्यान दगडफेक

पुणे

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक

भाजप -काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने

आंदोलनादरम्यान दगडफेक करण्यात आली

दगडफेकीत गाडीचे मोठे नुकसान

भाजप काँग्रेसमध्ये झालेल्या तणाव स्थितीतून दगडफेक

Mumbai: मुलुंड मेट्रो पूल अपघात प्रकरण, आरोपींना आज भोईवाडा कोर्टात हजर करणार

मुंबई -

मुलुंड मेट्रो पूल अपघात प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना आज भोईवाडा कोर्टात हजर करणार

काल पूल कोसळून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या चार जणांपैकी एकाच्या मृत्यूस जबाबदार धरत मेट्रोच्या पाच जणांना मुलुंड पोलिसांनी केली अटक

कामात निष्कळजीपणा आणि मृत्यूस जबाबदार धरून गुन्हा दाखल करून केली अटक

Jalgaon: महाशिवरात्रीनिमित्त कपिलेश्वर महादेव मंदिरावर फुलांनी सजवण्यात आले

जळगाव -

कपिलेश्वर महादेव मंदिरावर विद्युत रोशनाई करण्यात आले

महादेव मंदिर फुलांनी सजवण्यात आले

कपिलेश्वर हेमाडपंती मंदिरामध्ये महाआरती करण्यात आले

५ हजार ५०१ शिव पिंडीचे वेल्हाळेत महाशिवरात्रीला पूजनासह अभिषेक ही

यंदाच्यामहाशिवरात्रीला ५ हजार ५०९ शिवपिंडींचे पूजन केले पहाटे चार वाजेपासून अभिषेक, पूजन,

Nagpur: भाजप युवा मोर्चाचे नागपुरात आंदोलन, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन

नागपूर -

भाजप युवा मोर्चाचे नागपुरात आंदोलन, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन

टिपू सुलतानची तुलना करताना शिवाजी महाराज सारखा योद्धा म्हणून उल्लेख केला होता

त्याविरोधात भाजप युवा मोर्चा करत आहे आंदोलन ...

पोलिसांनी लावला मोठा बंदोबस्त ..

Jalna: जालन्यात खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपची निदर्शने

जालना -

जालन्यात खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपची निदर्शने

टिपू सुलतान मुर्दाबादच्या भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने वाद

तर भाजप सरकार विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Solapur: सोलापूरच्या मल्लिकार्जुन मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी

सोलापूर -

- सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देरामेश्वरांनी स्थापन केलेल्या मल्लिकार्जुन मंदिरात हजारो भक्तांनी पहाटे पासूनच महादेवाच्या दर्शनासाठी रांगा लावल्यात.

- देवाधि देव महादेवांना शांत ठेवण्यासाठी त्यांची स्तुती करण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री.

- देशभरासह सोलापूरमध्येही महाशिवरात्रीची धामधूम पाहायला मिळतेय.

- 900 वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा अद्यापही अखंडितपणे सुरु आहे.

- याशिवाय सिध्दरामेश्वरांचे गुरू मल्लिकार्जुन महाराजांच्या मंदिरातही भाविकांनी गर्दी केलीय.

- अनेक महिला भक्तही मोठ्याप्रमाणात महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात दर्शनासाठी दाखल झालेत.

- रात्री १२ वाजेपर्यंत भक्तांची रीघ या ठिकाणी दर्शनासाठी सुरु असते.

Mumbai:  मुलुंड अपघात प्रकरणात ५ जणांना अटक, पोलिसांनी MMRDA कडून सेफ्टी सर्टिफिकेट मागवले

मुंबई -

मुलुंड अपघात प्रकरणात पोलिसांनी ५ जणांना अटक

त्यात काल पासून पोलिसांनी या प्रकल्पची संपूर्ण माहिती घेतली..

पोलिसांनी एमएमआरडीएकडून सेफ्टी सर्टिफिकेट मागवून घेतले आहे

सेफ्टी सर्टिफिकेट मिळाल्या नंतर अपघात झालेल्या ठिकाणचा रस्ता सुरु करण्यात आला

काल झालेल्या घटनेनंतर एमएमआरडीएने सर्व सिमेंट ब्लॉक आणि कठाडे तपासून घेतले

काम सुरु असताना ताब्यात घेतलेल्या पैकी डेप्युटी मॅनेजर सौरभ सिंह आणि सुपरवायझर प्रशांत भोईर उपस्थित होते

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरेंना रुग्णालयात केलं दाखल

- उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे रुग्णालयात दाखल

- मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

- गेल्या तीन दिवसांपासून उपचार सुरू असल्याची माहिती

- नेमका कोणत्या आजारावर उपचार सुरू आहेत, याबाबत अधिकृत माहिती नाही

- सूत्रांकडून माहिती – तेजस ठाकरे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली

- उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी रुग्णालयात जाऊन केली प्रकृतीची विचारपूस

Pune: पुण्यात भाजपच्या वतीने काँग्रेस हाऊसवर काढला जाणार मोर्चा

पुणे -

हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजप आक्रमक

भाजपच्या वतीने काँग्रेस हाऊसवर काढला जाणार मोर्चा

शहराध्यक्ष धीरज घाटे माध्यमांशी बोलत आहेत

Pune: भाजपच्या आंदोलनाला काँग्रेस देणार प्रत्युत्तर

भाजपच्या आंदोलनाला काँग्रेस देणार प्रत्युत्तर

भाजपने काँग्रेस भवन मध्ये शिरण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे प्रत्युत्तर देणार

काँग्रेसचे पुणे अध्यक्ष अरविंदे शिंदे यांची माहिती

काँग्रेस भवन येथे काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र येण्यास सुरुवात

भाजपने लोकशाही मार्गाने आंदोलन करावे

मात्र उल्लंघन केल्यास आम्ही ही उत्तर देऊ

Nashik: हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात नाशिकमध्ये भाजपचं आंदोलन

नाशिक -

- नाशिकमध्ये भाजपचं आंदोलन

- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपचं आंदोलन

- सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी केल्यानंतर नाशिकमध्ये भाजप आक्रमक

- नाशिक मधील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाजवळ भाजपचं आंदोलन

Satara: सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचाच होणार - जयकुमार गोरे

सातारा -

सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचाच होणार

जागा आमच्या कमी आल्या म्हणून अध्यक्ष होणार नाही असं कोणीही समजू नये- मंत्री जयकुमार गोरे...

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे पालकमंत्री शंभूराजे देसाई व मंत्री मकरंद पाटील यांना थेट आव्हान...

विरारच्या श्री शेषनागलिंग मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या विरारच्या श्री शेषनागलिंग मंदिरात महाशिवरात्रि निमित्ताने भाविकांची तुफान गर्दी

दर्शनासाठी भाविकांची मंदिराबाहेर 5 ते 6 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मंदिरात रात्री 12 वाजता अभिषेक झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी सुरू करण्यात आले.

किडनी प्रकरणातील डॉक्टरचा असहकार

संपूर्ण देशात खळबळ उडवणाऱ्या बहुचर्चित किडनी रॅकेट प्रकरणातील दिल्ली येथील मुख्य संशयित डॉ. रवींद्रपाल सिंग पोलिसांच्या चौकशीत सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे. उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने दिलेल्या सशर्त अटकपूर्व जामीनानुसार, डॉ. सिंग सध्या चंद्रपूर येथील तपासी अधिकाऱ्यांकडे दररोज हजेरी लावत आहे. मात्र चौकशीदरम्यान पोलिसांनी विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांना तो वारंवार “आय डोन्ट रिमेंबर” असे उत्तर देत असल्याने तपासात अडथळे येत असल्याची माहिती आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील रोशन कुडे किडनी प्रकरणाच्या तपासात त्रिची येथील स्टार क्रिम्स हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आले होते. या शस्त्रक्रियांमध्ये डॉ. राजरत्नम गोविंदसामी आणि डॉ. रवींद्रपाल सिंग यांचा सहभाग असल्याचा संशय आहे.

Shirur-शिरूर नगरीचे ग्रामदैवत श्री रामलिंग महाराजांच्या यात्रा उत्सवाला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरूर नगरीचे ग्रामदैवत आणि पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध संत श्री रामलिंग महाराज यांच्या यात्रा उत्सवाला आज मोठ्या भक्तीभावाने सुरुवात झालीय

यात्रा उत्सवात काठी, पालखी आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाने संपूर्ण शहर भक्तिमय झाले असून प्रभू रामलिंगांच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. श्रद्धा, उत्साह आणि भजन-कीर्तनांच्या गजरात रामलिंग महाराजांचा उत्सव मंगल वातावरणात सुरू आहे

Shirur-शिरूर आणि आंबेगाव तालुक्यात दोन बिबट जेरबंद

सहा वर्षांची मादी बिबटही यामध्ये आहे. गेल्या तीन महिन्यांत पिंपरखेड परिसरात हा 37 वा बिबट जेरबंद झाला असून वनविभागाच्या या मोहिमेचं कौतुक होत आहे. मात्र, अल्पावधीत इतक्या मोठ्या प्रमाणात बिबट्यांची उपस्थिती दिसून येत असल्याने लोकवस्तीलगत बिबट्यांचं वास्तव्य धोक्याचं ठरत असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं सावट कायम आहे.

बंजारा तांड्यात सेवालाल महाराजांच्या जयंतीचा उत्सव

बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचा उत्सव यवतमाळ जिल्ह्यातील बंजारा तांड्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करताहेत. बंजारा तांड्यातील महिला पुरुष तरुण तरुणी एकत्र येऊन तांड्यातील विविध चौकातून सेवालाल महाराज जयंती निमित्त मिरवणूक काढून मोठ्या थाटात सेवालाल महाराजांची जयंती साजरी केली जाते आहे.

Shirur-पिंपरी दुमाला येथील प्राचीन श्री सोमेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला शिवभक्तांची अलोट गर्दी

‘हर हर महादेव’च्या जयघोषात परिसर भक्तिमय झाला असून दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पांडवकालीन स्थापनेचे हे मंदिर असल्याने पंचक्रोशीसह दूरवरूनही भाविकांनी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावली आहे. महाभिषेक, रुद्राभिषेक आणि विशेष पूजाविधीनंतर दिवसभर भजन-कीर्तनाच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमत आहे

सोलापूर गोवा विमानसेवा आजपासून तीन दिवस राहणार बंद

- सोलापूर गोवा विमानसेवा आजपासून तीन दिवस राहणार बंद, 17 फेब्रुवारी रोजी तांत्रिक कारणामुळे सोलापूर मुंबई विमान सेवा रद्द

- गोवा विमानतळावर रनवेचे काम सुरू असल्याने येथून टेकऑफ आणि लँडिंग होण्यास अडचण.

- त्यामुळे 15 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी पर्यंत सोलापूर गोवा विमान सेवा रद्द करण्यात आली.

- ऐनवेळी सोलापूर गोवा विमान सेवा रद्द झाल्यामुळे प्रवाशांची अडचण.

- बुकिंग केलेल्या प्रवाशांचे एअरलाइन्स कडून शंभर टक्के पैसे परत दिले जाणार.

- तर 17 फेब्रुवारी रोजी तांत्रिक अडचणीमुळे मुंबई येथील उड्डाण रद्द असणार.

लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रेस प्रारंभ

लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रेला आज महाशिवरात्रीपासून सुरुवात झाली आहे. गवळी समाजाच्या वतीने मंदिरात दुग्धअभिषेक करून यात्रेस प्रारंभ होतो., आज पासून पुढचे पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेस सांस्कृतिक व धार्मिक परंपरा आहे. गौरीशंकर मंदिरातून पारंपारिक झेंड्याच्या काट्यांची मिरवणूक यावेळी निघणार आहे तर यात्रा महोत्सव काळात आनंद मेळा, कृषी प्रदर्शन पशुप्रदर्शन, यासह इतर धार्मिक व पारंपारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे

आजारपणाला कंटाळून ३० वर्षीय तरुणाची आत्महत्या

भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुंदरटोला येथे एका ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. महेंद्र इनवाते असे मृत तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र हा गेल्या काही दिवसांपासून एका दीर्घकालीन आजाराने त्रस्त होता. या आजारपणामुळे तो अत्यंत नैराश्यात होता. अखेर या आजाराला आणि वेदनेला कंटाळून त्याने आपले जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.या घटनेमुळे सुंदरटोला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

श्री रामेश्वरम येथे भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त मोठी गर्दी

महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र रामेश्वरम येथे यावेळी भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर हे सकाळपासूनच भाविकांसाठी खुल करण्यात आलं होतं .या मंदिराची आख्यायिका अशी आहे की प्रभू श्रीराम व सीता माता हे वनवासात जात असताना यावेळी प्रभू श्रीराम व सीतामाता यांनी या दोन स्वयंभू शिवलिंगाची स्थापना केली आहे अशी या मंदिराची आख्यायिका असून तापी अंजनी गिरणा या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगम या ठिकाणी असून या वेळी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी मोठी दर्शनासाठी या मंदिरात गर्दी केली होती

महाशिवरात्रीचा उत्साह;दर्शनासाठी भाविकांची मंदिरात गर्दी,'हर हर महादेव'चा जयघोष

धाराशिवच्या उमरगा शहरात ऐतिहासिक महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे.पहाटेपासूनच विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.‘हर हर महादेव’च्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला असून सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. पहाटे मंगळआरतीनंतर अभिषेक, रुद्राभिषेक आणि विशेष पूजाविधी पार पडले.महाशिवरात्री निमित्त धार्मिक वातावरण निर्माण झाले असून भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा संगम पाहायला मिळत आहे.प्रशासनाकडून सुरक्षेची काळजी घेतली जात असून सण शांततेत आणि आनंदात पार पडावा यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत.

पुणे चारित्र्य पडताळणी पंधरा दिवसां

नागरिकांना सरकारी खाजगी नोकरी तसेच प्रदेशात जाण्यासाठी आवश्यक असलेल्या पासपोर्टसाठीच्या चरित्र पडताळणी प्रक्रियेचा कालावधी 30 दिवस निश्चित केला आहे मात्र अर्जाची वाढती संख्या निवडणुका सण उत्सवातील बंदोबस्त आणि तांत्रिक अडचणीमुळे काही प्रकरणे प्रलंबित राहत असल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास या पुढील काळात चारित्र्य पडताळणी पंधरा दिवसांत करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसह आमदार दीपक केसरकर यांना कुणकेश्वराच्या प्रथम पूजेचा मान

श्री देव कुणकेश्वर मंदिरामध्ये यावर्षी प्रथम पूजेचा मान सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांना देण्यात आला. मध्यरात्री जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे व आमदार दिपक केसरकर यांच्याहस्ते शासकीय पुजा संपन्न झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. कुणकेश्वरला दक्षिण कोकणची काशी म्हणून मानलं जातं कोकणच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची पर्वणी असल्याचे दिपक केसरकर यांनी सांगितलेय

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

आकाशात उडणारे हेलिकॉप्टर अनेकांनी पाहिलेले असते; पण त्यात बसण्याचा अनुभव प्रत्येकाला मिळत नाही.ओय फाउंडेशन आणि महालक्ष्मी एव्हिएशन यांनी दिव्यांग मुलांसाठी असा क्षण साकारला, ज्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तेज खुलले. ओवायई फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. सिमरन जेठवानी यांच्या पुढाकाराने व महालक्ष्मी एव्हिएशनचे नितीन गोते, कॅप्टन नितीन वेल्डे यांच्या सहकार्याने ३५ मुलांना सहा मिनिटांची हेलिकॉप्टर सफर घडवून आणण्यात आली.

सांगलीत कृष्णा काठावर भारत विरुद्ध इराण कुस्ती रंगली..

सांगलीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कुस्त्यांचे मैदान पार पडले आहे.. सांगलीतल्या कृष्णा नदीच्या काठावर सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आलं होतं.. यावेळी 100 हून अधिक छोट्या-मोठ्या निकाली कुस्त्या यावेळी पार पडल्या. यामध्ये भारत विरुद्ध इराण अशी कुस्ती सर्वात लक्षवेधी ठरली.. महाराष्ट्राच्या पैलवान सुबोध पाटील विरुद्ध इराणचा जलाल यांच्यात कुस्ती पार पडली.. तर माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली.. मात्र थरारक कुस्ती बरोबरीत सुटली.. त्यामुळे दोघांनाही विजय घोषित करण्यात आलं. या कुस्त्या पाहण्यासाठी कृष्णा काठी कुस्ती शौकीनाणी तोबा गर्दी केली होती..

महाडमध्ये महाशिवरात्र उत्सवास उत्साहात प्रारंभ

आज महाशिवरात्री उत्सवास महाडमध्ये उत्साहात प्रारंभ झाला. महाडचे ग्राम दैवत श्री विरेश्वर महाराज मंदीर, महाकालेश्वर मंदीर, दादली येथील बाराजोर्तिंलींग मंदीरामध्ये सकाळ पासुनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आभिषेक, विधीवत पुजाविधींचे शिव मंदीरांमध्ये आयोजन करण्यात आले. आज पासून महाडचे ग्रामदैवत असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवास प्रारंभ होत आहे. पुढे पाच दिवस चालणाऱ्या या छबिना उत्सवाला शिवकालिन परंपरा आहे.

औंढा नागनाथ मध्ये महाशिवरात्रीचा उत्साह शिगेला

महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील शिव मंदिरांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात मध्यरात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सपत्नीक औंढा नागनाथ मंदिरात शासकीय महापूजा करत प्रभू शिवशंकराला दुग्धाभिषेक केला तर यंदाच्या वर्षी प्रथमच जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून औंढा नागनाथ मध्ये ड्रोन कॅमेराद्वारे शिवमंदिराच्या परिसरात लेझर शो दाखवण्याचा संकल्प केला आहे.

अंबरनाथ -   महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची गर्दी

अंबरनाथचं हे प्राचीन शिवमंदिर तब्बल ९६६ वर्ष जुनं असून एक जागृत देवस्थान म्हणून त्याची ख्याती आहे. त्यामुळेच दरवर्षी महाशिवरात्रीला ५ ते ६ लाख भाविक शिवमंदिरात येत असतात. यानिमित्ताने अंबरनाथ शहरात ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्राही भरते. यासाठी प्राचीन शिवमंदिराचे परंपरागत पुजारी पाटील कुटुंब आणि पोलीस, तसंच अंबरनाथ नगरपालिका यांच्याकडून चोख नियोजन केलं जातं.

डोंबिवलीत पहाटे भीषण आग! रविकिरण सोसायटी, राज अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये 29 दुचाकी जळून खाक

राज अपार्टमेंट, रविकिरण सोसायटी, जय भारत स्कूलजवळ, चेडा नगर, सागाव – डोंबिवली पूर्व येथे पहाटे 4.15 वाजताच्या सुमारास पार्किंगमध्ये अचानक आग

बेसमेंटमधील मोटरसायकल पार्किंगला लागलेल्या आगीत एकूण 29 दुचाकी जळून खाक

आगीचा भडका उडाल्याने पाच जण किरकोळ जखमी, काहींना ऑप्टिलाईट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल

बीडच्या परळी येथे महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

बीडच्या परळी येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभुवैद्यनाथा चा महाशिवरात्रीनिमित्त दर्शन योग साधण्यासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत... पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी वाढत असून जय शिवशंभूचा गजर परिसरात निनादत आहे... आज दिवसभरात लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घेणार असून या सर्व भाविकांसाठीच्या सुविधा मंदिर संस्थांकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत याबरोबरच पोलीस प्रशासनाकडून देखील शहरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.. मंदिर परिसरात विविध सेवाभावी संस्थांकडून उपवासाचे पदार्थ देखील वाटप केले जात असून रात्री उशिरापर्यंत दर्शन रांगा सुरू राहतील अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली.

बीड: महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्रीपासून शिवालय गजबजली; बीडचे ग्रामदैवत कंकालेश्वर मंदिर मध्यरात्रीपासून खुले

बीडमध्ये महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्रीपासून शिवालय दर्शनासाठी गजबजली आहे. बीड मधील कंकालेश्वर या प्राचीन हेमाडपंती मंदिरात मध्यरात्रीपासून दर्शन आणि अभिषेक सुरू आहे. तर पहाटे भाविकांच्या उपस्थितीत महापूजा पार पडली. कंकालेश्वर मंदिर साधारणपणे १२ व्या शतकात चालुक्य किंवा यादव काळातील असावे असा अंदाज वर्तवला जातो. भगवान शंकरांनी 'कंकासुर' नावाच्या राक्षसाचा वध येथे केला होता. अशी पौराणिक कथा आहे. तर हे मंदिर एका मोठ्या सरोवराच्या मध्यभागी बांधलेले आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी एक अरुंद पूल आहे. मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात असून त्यावर अत्यंत कोरीव काम केलेले आहे. हे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण आहे. कंकालेश्वर बीड शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. यावर्षी मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत आहे.

मूल पकडणारी टोळी समजून जमावाने वेडसर व्यक्तीला केली मारहाण

हिंगोली शहरात एका वेडसर व्यक्तीला मुलं पकडणाऱ्या टोळीतील सदस्य समजून जमावाने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे, हिंगोली बस स्थानकाच्या पाठीमागील भाग असलेल्या मस्तानशाह नगर मध्ये ही घटना घडली आहे मात्र पोलिसांच्या चौकशी मध्ये हा व्यक्ती वेडसर असल्याचे स्पष्ट झाले असून तो लहान चिमुकल्या सोबत खेळत असल्याने नागरिकांना संशय आला असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे दरम्यान या घटने प्रकरणी हिंगोली शहर पोलिसांनी नोंद केली आहे.

Maharashtra Live News Update : माझ्या नादाला लागला तर तुम्हाला माजी खासदार करेल- गणेश नाईक

अजून सुद्धा मी सांगतो माझ्या नादाला लागला तर ठाणे जिल्ह्यातील त्यांचं जे अस्तित्व आहे फक्त परवानगी मिळाली पाहिजे. एकनाथ शिंदे यांची एकही महापालिका येऊ देणार नाही तसेच एकनाथ शिंदे यांची पुत्र असलेले श्रीकांत शिंदे यांना कायमचा माजी खासदार करायला लावला लागेल, असे एकनाथ शिंदे

भीमाशंकर मंदिर बंद

पुणे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत महाशिवरात्रीची शासकीय महापूजा पार पडली. मात्र, भिमाशंकर विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या मंदिराच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरण कामांमुळे मंदिर भाविकांसाठी तीन महिने बंद ठेवण्यात आले असून, यंदा महाशिवरात्रीचा उत्सव भाविकांविना पार पडलाय

डहाणूकारांचे कासव ओमान देशाच्या समुद्रात पोहोचले

डहाणूकारांचे धवल लक्ष्मी हे कासव अडीच हजार किलोमीटरचा सागरी प्रवास करत ओमान देशाच्या समुद्रात पोहोचले आहे. ऑलिव्ह रीडले या प्रजातीच्या मादी कासवाच्या पाठीवर सॅटॅलाइट टॅग लावल्यामुळे कासवाच्या जीवन पद्धतीच्या अभ्यासाला गती मिळत आहे. डहाणू जवळच्या समुद्रातून वीस नंबर पासून प्रवासाला निघालेल्या या मादी कासवाने आत्तापर्यंत साधारण 2500 किलोमीटरचा समुद्र प्रवास केला आहे या प्रवासात ते समुद्रात अडीचशे मीटर खोलीपर्यंत देखील जाऊन आले आहे सध्या ते ओमानच्या 212 सागरी मैल समुद्री कक्षेत आहे .कांदळवन कक्षाने भारतीय वन्य जीव संस्थेच्या सहकार्याने आणि वाईल्ड लाईफ कंजर्वेशन अँड ऍनिमल वेल्फेअर वाईल्ड लाईफच्या मदतीने या कासवाच्या पाठीवर टॅग लावल्याने डहाणू ते ओमान पर्यंत या कासवाचा सागरी प्रवास झाल्याचे आता निष्पन्न झाले आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांना आग

पालघर _ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांना आग लागल्यानंतर डहाणू, पालघर , वसई विरार येथील अग्निशमना दलाला प्राचारण करावे लागते. मात्र अग्निशामकल दल पोहोचेपर्यंत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.त्यामुळे महामार्गावर अग्निशमन तैनात करण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र नियमात बसत नसल्याचे कारण देत महामार्ग प्राधिकरण नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याने प्रवासी वर्ग तसेच नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही वर्षात वाहनांची वर्दळ वाढली आहे. चालत्या गाडीला आग लग्नाच्या घटना कमालीने वाढल्या आहेत. तीन ते चार वर्षात महामार्गावर जवळपास 300 ते 400 वाहनांना आग लागण्याची घटना घडल्या आहेत. असे असताना महामार्गावर महामार्ग प्राधिकरणाची सुसज्ज अशी अग्निशमन यंत्रणा नाही हे मोठे दुर्दैव मानावे लागेल

जालन्यात दुचाकीवर आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावले

जालन्यात दुचाकीवर आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे.जालना शहरातील संभाजीनगर परिसरात काल सायंकाळी हि घटना घडली असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.सुनीता गवडे या फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्या घरी परतताना दोन अनोळखी दुचाकीवरून आले. त्यांनी सुनीता गवडे यांच्या गळ्यातील सुमारे दीड तोळ्याचे 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून पळ काढलाय. याप्रकरणी दोन अज्ञात आरोपींविरोधात सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com