Ration Shop : रेशन दुकानदाराचा अजब कारनामा; धान्याच्या मोबदल्यात लाभार्थ्यांना पैसे वाटप, अकोला जिल्ह्यातील प्रकार उघड

Akola News : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मोठ्या प्रमाणात धान्य साठा पुरवला गेला आहे. मात्र, अकोल्यात रेशन दुकानदाराकडून नागरिकांना धान्य वाटप करण्याऐवजी पैसे दिले जात आहेत
Ration Shop
Ration ShopSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : स्वस्त धान्य दुकानातून रेशन धान्य लाभार्थ्यांना दर महिन्याला धान्याचे वाटप करण्यात येत असते. अर्थात गोर गरिबांना याचा लाभ मिळत असतो. मात्र अकोल्यात नागरीकांना रेशन धान्याच्या मोबदल्यात चक्क पैसे वाटप केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २५ किलो धान्याच्या मोबदल्यात ३०० ते ३५० रुपये रेशन दुकानदाराकडून दिले जात आहे. अर्थात धान्य वाटपात मोठा भ्रष्टाचार होत आहे. 

अकोला जिल्ह्यातील गुडधीच्या सरकारी रेशन दुकानात हा प्रकार समोर आला आहे. गुडधी भागातल्या सरकारी स्वस्त धान्य दुकानातील पैसे वाटपाचा प्रकार उघड झाला. या ठिकाणी थेट रेशन कार्ड धारकांना सरकारी धान्य ऐवजी त्या मोबदल्यात पैसे दिले जात असल्याचा हा प्रकार समोर आहे. काहींना रेशन कार्डवर प्रत्येकी २० ते २५ किलो धान्य मिळत असेल, तर त्यामागे म्हणजेच धान्य मोबदल्यात ३५० रुपये असे पैसे दिले जातं आहे. 

Ration Shop
Malkapur Crime : दोन गटात जुना वाद उफाळला; युवकाची चाकूने भोसकून हत्या, एकजण गंभीर

धान्य साठवल्यानंतर बाजारात काळाबाजार?

स्वस्त धान्य दुकानदाराकडून हा संपूर्ण प्रकार सुरू आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात सरकारकडून धान्य साठा पुरवला गेला आहे. मात्र, अकोल्यात रेशन दुकानदाराकडून नागरिकांना धान्य वाटप करण्याऐवजी त्यांना धान्याच्या मोबदल्यात पैसे वाटप केले जात आहे. अर्थात धान्य वाटपात मोठा भ्रष्टाचार सुरु असून धान्य साठवल्यानंतर बाजारात काळाबाजार केला जातो? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

Ration Shop
World Mental Health Day : झोपेचा अभाव व मोबाईलमुळे वाढला मानसिक आजाराचा धोका; कल्याण- डोंबिवलीत ७७ रुग्णांवर उपचार सुरु

पैसे देत असल्याचा व्हिडीओ आला समोर 

गुडधीच्या सरकारी रेशन दुकानात धान्य वाटपात मोठा भ्रष्टाचार होत आहे. धान्याऐवजी आलेल्या लाभार्थ्यांना पैसे दिल्याचे समोर आले आहे. याचं कारनाम्याचे काही VIDEO समोर आले आहेत. या संपूर्ण प्रकरणानंतर आता संबंधित अन्न पुरवठा विभाग कुठली कारवाई करतं? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. गोरगरिबांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध व्हावे, हा हेतू डोळ्यापुढे ठेवत स्वस्त धान्य दुकानांने लागले आहे, असे असले तरी या योजनेचा फायदा गरजू आणि गरिबांना होण्याऐवजी दुकानचालक आणि दलालानांच होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com