तुमचाही फोन टॅप होतोय? दुर्लक्ष करू नका! या 5 संकेतांमधून लगेच ओळखा

Phone Tapping Alert: तुमचाही फोन टॅप होत आहे का? फोनची बॅटरी लवकर संपणे, डेटा वापर वाढणे, अनोळखी ॲप्स आणि विचित्र आवाज ही कोणती संकेत असू शकतात? जाणून घ्या फोन टॅपिंगची 5 लक्षणे आणि स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या सेटिंग्ज.
Unusual battery drain and overheating.
Unusual battery drain and overheating.saam tv
Published On: 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी आपला फोन टॅप होत असल्याचा आरोप माध्यमांसमोर केला होता. फोन टॅपिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या फोनवरील संभाषण दुसऱ्या व्यक्तीकडून ऐकले जाणे किंवा रेकॉर्ड केले जाणे. काहीवेळा कायदेशीर प्रक्रियेनुसार फोन टॅपिंग केले जाते. तर काहीवेळा स्पायवेअर किंवा संशयास्पद ॲप्सच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे फोनवर नजर ठेवली जाऊ शकते.

Unusual battery drain and overheating.
Maharashtra Government Scheme: महाराष्ट्र सरकारची एकल महिलांसाठी नवी योजना, काय आहे यामागचं सत्य?

अशा परिस्थितीत तुमचाही फोन टॅप होत आहे का, हे कसे ओळखायचे? स्मार्टफोनमध्ये काही संशयास्पद बदल दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. फोन टॅपिंग किंवा स्पायवेअरची शक्यता दर्शवणारे काही संकेत ओळखून तुम्ही तुमच्या फोनची सुरक्षितता वाढवू शकता.

Unusual battery drain and overheating.
DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 8% वरून थेट 44% वर, कोणत्या राज्यात घेतला निर्णय

1. फोन विनाकारण गरम होणे आणि बॅटरी लवकर संपणे

तुमचा स्मार्टफोन कोणतेही मोठे काम सुरू नसतानाही गरम होत असेल किंवा त्याची बॅटरी नेहमीपेक्षा वेगाने संपत असेल, तर हे एक कदाचित संकेत असू शकतात. फोनच्या बॅकग्राउंडमध्ये एखादे संशयास्पद ॲप किंवा स्पायवेअर सतत सक्रिय असल्यास प्रोसेसर आणि बॅटरीवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. मात्र, केवळ फोन गरम होणे किंवा बॅटरी लवकर संपणे म्हणजे फोन टॅप होत आहे, असा निष्कर्ष काढता येत नाही.

2. मोबाइल डेटाचा वापर अचानक वाढणे

फोनमधील स्पायवेअर किंवा हेरगिरी करणारे ॲप्स काही वेळा ऑडिओ फाइल्स, संभाषणाशी संबंधित माहिती आणि अन्य डेटा बाहेरील सर्व्हरवर पाठवू शकतात. यामुळे मोबाइल डेटाचा वापर वाढू शकतो. तुम्ही इंटरनेटचा फारसा वापर करत नसतानाही डेटा वेगाने संपत असेल, तर फोनमधील ॲप्सचा डेटा वापर तपासून पाहा.

Unusual battery drain and overheating.
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट? पगार, पेन्शन अन् HRA मध्ये बंपर वाढीचा प्रस्ताव

3. फोनवर बोलताना विचित्र आवाज येणे

फोनवर बोलताना वारंवार क्लिक होण्याचा आवाज, स्वतःच्याच आवाजाची प्रतिध्वनी किंवा पार्श्वभूमीत विचित्र आवाज ऐकू येत असल्यास सतर्क राहा. मात्र, नेटवर्कमधील अडचणी किंवा कॉलच्या गुणवत्तेमुळेही असे आवाज येऊ शकतात. त्यामुळे केवळ या संकेतावरून फोन टॅप होत असल्याचे निश्चित मानू नका.

4. अनोळखी ॲप्स आणि संशयास्पद मेसेज

तुम्ही कधीही डाउनलोड न केलेले ॲप्स फोनमध्ये दिसत असतील किंवा विचित्र कोड आणि अक्षरे असलेले संशयास्पद SMS येत असतील, तर त्यांची तपासणी करा. फोनमधील ॲप्सची यादी तपासा आणि अनोळखी ॲप्सना दिलेल्या परवानग्यांकडे लक्ष द्या.

5. फोनच्या कामकाजात अचानक बदल

फोन वारंवार हँग होणे, अनपेक्षितपणे रीस्टार्ट होणे किंवा बॅकग्राउंडमध्ये अनोळखी ॲप्स सक्रिय दिसणे, हेही तपासण्यासारखे संकेत आहेत. अशा बदलांमागे सॉफ्टवेअरमधील त्रुटी किंवा इतर तांत्रिक कारणेही असू शकतात.

फोन टॅपिंगपासून बचाव करण्यासाठी काय कराल?

1. कॉल फॉरवर्डिंग तपासा : फोनच्या डायलरमध्ये `*#21#` किंवा `*#62#` हे कोड टाकून कॉल फॉरवर्डिंगची स्थिती तपासता येऊ शकते. मात्र, हे कोड फोन टॅपिंग शोधत नाहीत. कॉल फॉरवर्डिंग दिसणे म्हणजे फोन टॅप होत आहे, असेही नाही.

2. पासवर्ड बदला : तुमच्या बँकिंग, ई-मेल आणि सोशल मीडिया खात्यांचे पासवर्ड सुरक्षित डिव्हाइसवरून बदला. शक्य असल्यास टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) सुरू करा.

3. संशयास्पद ॲप्स तपासा : फोनमधील अनोळखी ॲप्स आणि त्यांना दिलेल्या परवानग्या तपासा. संशयास्पद ॲप्स काढून टाका आणि फोनचे ऑपरेटिंग सिस्टम अपडेट ठेवा.

4. आयफोन युजर्ससाठी Lockdown Mode : तुम्ही आयफोन वापरत असाल आणि गंभीर सायबर हल्ल्याचा धोका वाटत असेल, तर Apple चे Lockdown Mode हे फीचर उपयोगी ठरू शकते. हे फीचर काही सुविधा मर्यादित करून संभाव्य सायबर हल्ल्यांचा धोका कमी करण्यास मदत करते.

हे फीचर सुरू करण्यासाठी Settings > Privacy & Security > Lockdown Mode या पर्यायावर जा. त्यानंतर Turn On Lockdown Mode वर टॅप करा. फोन रीस्टार्ट झाल्यानंतर हे फीचर सक्रिय होईल.

5. गंभीर संशय असल्यास तज्ज्ञांची मदत घ्या : तुमच्या फोनवर हेरगिरी होत असल्याचा ठोस संशय असल्यास डिजिटल फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून डिव्हाइसची तपासणी करून घ्या. तसेच सायबर क्राइम सेलमध्ये तक्रार नोंदवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.