Maharashtra Government Scheme: महाराष्ट्र सरकारची एकल महिलांसाठी नवी योजना, काय आहे यामागचं सत्य?

Single Women Scheme: महाराष्ट्र सरकारने एकल महिलांसाठी नवीन योजना सुरू केल्याची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमागचे सत्य काय ते घ्या जाणून...
Maharashtra Government Scheme: महाराष्ट्र सरकारची एकल महिलांसाठी नवी योजना, काय आहे यामागचं सत्य?
Maharashtra Government SchemeSaam Tv
Published On: 
  • महाराष्ट्र सरकार महिलांसाठी नवी योजना सुरू करण्याच्या तयारीत

  • एकल महिलांसाठी सरकारने नवी योजना सुरू केल्याची पोस्ट व्हायरल

  • एकल महिलांच्या योजनेबाबत व्हायरल होणारी पोस्ट खोटी

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेनंतर राज्यातील एकल महिलांसाठी नवी योजना सुरू केली असल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींसाठी ज्याप्रकारे योजना सुरू केली तशील एकल महिलांच्या फायद्यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या योजनेअंतर्गत एकल महिलांना आर्थिक मदत केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. पण सध्या सोशल मीडियावर या योजनेसंदर्भात व्हायरल होणारा हा मेसेज खोटा असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे.

महाराष्ट्र सरकारने एकल महिलांसाठी नवीन योजना सुरू केल्याचे सोशल मीडियावरील दावे दिशाभूल करणारे असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत सांगितले की, राज्य शासन ‘एकल महिला सक्षमीकरण, संरक्षण व सर्वांगीण विकास धोरण २०२६’ लवकरच लागू करणार आहे. त्याबाबतची कार्यवाही सुरू असून या धोरणाअंतर्गत कुठल्याही योजनेसंदर्भात कोणताही शासन निर्णय, पात्रतेचे निकष किंवा अर्ज प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली नाही.' त्यामुळे अशा दिशाभूल करणाऱ्या मेजेस आणि पोस्टकडे महिलांनी दुर्लक्ष करावे असा सल्ला सरकारने महिलांना दिला जात आहे.

दरम्यान, फडणवीस सरकार राज्यातील एकल महिलांना आर्थिक आणि सामाजिक आधार देण्यासाठी नवीन योजना आणण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर एकल महिलांसाठी स्वतंत्र योजना सुरू करण्याच्या दिसेने सरकारने पावलं उचलली आहेत. राज्यात १२ लाखांहून अधिक एकल महिला आहेत. त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सरकार ही योजना आणण्याच्या प्रयत्नात आहे. पण ही योजना अद्याप आली नाही तोवरच त्याच्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होऊ लागल्या आहेत. पण त्यात काही सत्यता नाही कारण सरकारने अद्याप या योजनेबाबत अधिकृत घोषणा केली नाही.

Maharashtra Government Scheme: महाराष्ट्र सरकारची एकल महिलांसाठी नवी योजना, काय आहे यामागचं सत्य?
Government Scheme : मुलींसाठी राज्य सरकारची ‘कन्या उडान योजना', नेमकं सत्य काय? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.