Government Scheme : मुलींसाठी राज्य सरकारची ‘कन्या उडान योजना', नेमकं सत्य काय? जाणून घ्या

Girls Government Scheme Fact Check : कन्या उडान योजना २०२६ महाराष्ट्र सरकारची योजना असल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे. व्हायरल पोस्टमागील सत्य जाणून घ्या.
Government Scheme Fact Check News
Government Scheme Fact Check News AI Image
Published On: 
Summary
  • कन्या उडान योजना २०२६’ महाराष्ट्र शासनाची योजना असल्याचा दावा खोटा

  • व्हायरल पोस्टमध्ये मुलींच्या शिक्षणापासून लग्नापर्यंत आर्थिक मदत मिळणार असल्याचा दावा

  • ही योजना बिहारची असल्याचं स्पष्ट

  • महाराष्ट्रात मुलींसाठी ‘लेक लाडकी योजना’ राबवली जाते

सोशल मीडियावर सध्या ‘कन्या उडान योजना २०२६’ या नावाने एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हा दावा दिशाभूल करणारा आहे. ‘कन्या उडान योजना २०२६’ ही महाराष्ट्र शासनाची योजना नाही.

काय आहे व्हायरल पोस्ट?

व्हायरल पोस्टनुसार, या योजनेंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी तसेच भविष्यातील लग्नासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना जाहीर केल्याचे पोस्टमध्ये सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक नागरिक या माहितीवर विश्वास ठेवून ती पुढे शेअर करत आहेत.

Government Scheme Fact Check News
Ration Card : पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारकांचे मोफत धान्य १ नोव्हेंबरपासून बंद होणार? काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य

काय आहे या दाव्याचे सत्य?

‘कन्या उडान योजना’ ही बिहारशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या योजनेचा महाराष्ट्र शासनाशी संबंध असल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे. सरकारी योजनांबाबतची माहिती तपासताना संबंधित राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरील घोषणा, शासन निर्णय आणि अधिकृत प्रसिद्धिपत्रके पाहणे आवश्यक आहे. केवळ सोशल मीडियावरील पोस्टच्या आधारे कोणत्याही योजनेची सत्यता निश्चित करता येत नाही.

Bihar Government Scheme
Bihar Government Scheme Saam tv

महाराष्ट्रात मुलींसाठी कोणती योजना आहे?

महाराष्ट्र शासनाकडून मुलींसाठी ‘लेक लाडकी योजना’ राबवली जाते. या योजनेंतर्गत पात्र मुलींना शासनाच्या निर्धारित अटींनुसार आर्थिक लाभ दिला जातो. याबाबतची अधिक माहिती सरकारी पोर्टलवर मिळेल. दरम्यान सरकारी पोर्टलवरची माहिती अधिकृत असून अन्य कोणत्याही माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com