Maharashtra Government: 'लाडकी बहीण'नंतर महिलांसाठी आणखी एक योजना, फडणवीस सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Government Plans New Scheme for Single Women: महाराष्ट्रातील एकल महिलांसाठी सरकार मोठं पाऊल उचलत आहे. लाडकी बहिणींनंतर सरकार एकल महिलांसाठी नवी योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे.
Maharashtra Government: 'लाडकी बहीण'नंतर महिलांसाठी आणखी एक योजना,  फडणवीस सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Maharashtra GovernmentSaam Tv
Published On: 
  • महाराष्ट्रात एकल महिलांसाठी नवीन योजना सुरू होणार

  • लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी सरकार आणखी एक योजना आणणार

  • मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

सचिन जाधव, पुणे

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही फडणवीस सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेला राज्याभरातील महिलांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि सरकारला देखील या योजनेमुळे निवडणुकीत फायदा झाला. लाडकी बहीण योजनेनंतर आता फडणवीस सरकार महिलांसाठी आणखी एक योजना आणण्याच्या तयारीत आहे. आता फडणवीस सरकारचा फोकस एकल महिलांवर आहे. महाराष्ट्रातील एकल महिलांसाठी सरकार नवी योजना आणण्याच्या तयारीत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही महत्वाची माहिती दिली.

अखिल भारतीय पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी सरकार एकल महिलांसाठी योजना आणणार असल्याची माहिती दिली. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, महाराष्टातील शाळा- कॉलेजमधील वडील नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करायला सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील महिला आत्महत्या करताना दिसत नाही. त्या सगळ्या संसार एकट्या सांभाळतात. अशा महिलांवर फोकस करायचं काम सध्या सुरू आहे.'

Maharashtra Government: 'लाडकी बहीण'नंतर महिलांसाठी आणखी एक योजना,  फडणवीस सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घ्यावे लागणार? ९२ हजार अपात्र लाभार्थ्यांमुळे खळबळ

चंद्रकांत पाटील यांनी पुढे सांगितले की, 'विद्यार्थ्यांच्या सर्व्हेत ३ लाख एकल महिला सापडल्या. आणखी महिलांची माहिती घेणे सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांना वडील नाही त्यांना याचा फायदा होणार आहे. १२ लाखांहून अधिक महाराष्ट्रात एकल महिला आहेत.' दरम्यान, पुण्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजाच्या विकासात मुलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी अखिल भारतीय पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी एकल महिलांसाठी योजना आणण्याबाबतची माहिती दिली.

Maharashtra Government: 'लाडकी बहीण'नंतर महिलांसाठी आणखी एक योजना,  फडणवीस सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Ladki Bahin Yojana: नवरात्रीनंतर दसराही गेला, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार? वाचा अपटेड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com