Ladki Bahin Yojana: नवरात्रीनंतर दसराही गेला, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार? वाचा अपटेड

Ladki Bahin Yojana September Installment : लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्याचे १५०० रुपये अजून जमा झालेले नाहीत. या संदर्भातली अपडेट जाणून घ्या.
Ladki Bahin Yojana July Instalment Update
Ladki Bahin Yojana July Instalment Updatemeta ai
Published On: 

सरकार महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी लाडकी बहीण योजना राबवत आहे. यातून महिन्याला १५०० रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात पाठवले जातात. हा हप्ता दर महिन्याच्या २० तारखेपर्यंत पाठवला जातो. तसेच सणासुदीच्या दिवसांमध्ये महिलांना भेट म्हणूनही हा हप्ता लवकरात लवकर किंवा कधीकधी दोन हप्ते एकत्र पाठवले जातात. मात्र आता नवरात्रीनंतर दसराही गेला. तरी महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा झालेला नाही. शिवाय आता ऑक्टोबर महिना संपायलाही १० दिवसच शिल्लक राहीले आहेत. याच संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

लाडकींना कधी मिळणार १५०० रुपये?

लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, २५ ऑक्टोबरनंतर लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दसऱ्यानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या हप्त्याबद्दल चर्चा होऊन निर्णन घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण सरकारकडून पैसे जमा होण्याची तारीख अजून जाहीर केलेली नाही.

Ladki Bahin Yojana July Instalment Update
DA Hike 2026: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दसऱ्यानंतर मिळणार खुशखबर! महागाई भत्ता 63% होण्याची शक्यता

सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र मिळणार का?

सप्टेंबरचा हप्ता रखडल्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याचे पैसेही एकत्र मिळणार का, याबद्दल चर्चा सुरू आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे मिळून ३,००० रुपये खात्यात जमा होण्याची अपेक्षा काही महिला व्यक्त करत आहेत. पण दोन्ही हप्ते एकत्र देण्याबद्दल कोणताही अधिकृत शासन निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे या चर्चांना सध्या फक्त शक्यता म्हणूनच पाहणं गरजेचं आहे.

Ladki Bahin Yojana July Instalment Update
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीएम किसानच्या २४व्या हप्त्याचे २,००० कधी जमा होणार?

दिवाळीआधी महिलांना दिलासा मिळणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत देतात. या पैशांचा सणासुदीच्या खरेदीसाठी महिलांना उपयोग होतो. त्यामुळे रखडलेल्या हप्त्याबाबत लाभार्थी महिलांचं लक्ष सरकारतच्या निर्णयाकडे लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com