DA Hike 2026: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दसऱ्यानंतर मिळणार खुशखबर! महागाई भत्ता 63% होण्याची शक्यता

Dearness Allowance Pensioners : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 60% वरून 63% होण्याची शक्यता आहे.
DA Hike 2026
DA Hike 2026saam tv
Published On: 

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्याबाबत (DA Hike 2026) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या महागाई भत्ता वाढीची कर्मचारी आणि पेन्शनधारक वाट पाहत आहेत. आता २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीत सरकार महागाई भत्ता वाढीबद्दल निर्णय घेणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. पण, यासंदर्भात सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

महागाई भत्ता ६० टक्क्यांवरून ६३ टक्के होणार?

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना बेसिक सॅलरीच्या ६० टक्के दराने महागाई भत्ता मिळत असल्याचं दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. जुलै २०२६ च्या सुधारित दरात ३ टक्क्यांची वाढ झाल्यावर DA टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. पण ही फक्त संभाव्य वाढ असून अंतिम निर्णय सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल.

DA Hike 2026
Green vs Golden Kiwi : हिरवी की गोल्डन? कोणत्या किवीमध्ये असतं जास्त प्रोटीन? वाचून व्हाल थक्क

१४ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये DA वाढीची घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. पण त्या बैठकीत याबाबत निर्णय जाहीर झाला नाही. त्यामुळे आता २१ ऑक्टोबरच्या बैठकीकडे कर्मचारी संघटना आणि पेन्शनधारकांचे लक्ष आहे.

DA Hike 2026
Tax Audit Deadline : २४ तासांत हे काम कराच, नाहीतर बसणार मोठा भुर्दंड; इन्कम टॅक्स विभागाचा अखेरचा इशारा

पगारात किती वाढ होऊ शकते?

समजा, एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी ३०,००० रुपये आहे. सध्याच्या ६० टक्के DA नुसार त्याला दरमहा १८००० रुपये महागाई भत्ता मिळतो. DA ६३ टक्के झाल्यावर ही रक्कम १८,९०० रुपये होईल. म्हणजेच दरमहा ९०० रुपये आणि वर्षाला १०,८०० रुपयांची वाढ होऊ शकते. महागाई भत्त्यात साधारणपणे वर्षातून दोनदा, जानेवारी आणि जुलैमध्ये सुधारणा केली जाते. यासाठी औद्योगिक कामगारांचा ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI-IW) आणि त्याच्या आधारे मोजली जाणारी महागाई विचारात घेतली जाते.

पेन्शनधारकांनाही मिळणार लाभ?

DA वाढीसोबत केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांच्या महागाई राहत (DR) दरातही वाढ होण्याची शक्यता असते. मात्र, वाढीचा दर, अंमलबजावणीची तारीख आणि थकबाकी याबद्दल अधिकृत घोषणा होणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com