

Ladki Bahin Yojana September Installment: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऑक्टोबर महिना अर्धा संपला असूनही सप्टेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यात जमा होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, २५ ऑक्टोबरनंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दसऱ्यानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हप्त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर झालेली नसल्याने लाभार्थी महिलांना आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते.
मागच्या काही महिन्यांत लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी महिन्याच्या अखेरीस वितरित करण्यात आला होता. जुलै महिन्याचा हप्ता २८ ऑगस्ट रोजी जमा झाला होता, तर ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची प्रोसेस २७ सप्टेंबरनंतर सुरू झाली होती. त्यामुळे सप्टेंबरचा हप्ताही ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरअखेरीस जमा झाला नाही, तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे मिळून ३००० रुपये एकत्र मिळणार का, याचीही चर्चा सुरू आहे. मात्र, दोन महिन्यांचे पैसे एकत्र देण्याबाबत सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे लाभार्थींनी अशा चर्चांवर पूर्णपणे अवलंबून राहू नये.
राज्यातल्या पात्र महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपयांचा सन्मान निधी थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) मदतीने खात्यात पाठवला जातो. ई-केवायसी आणि लाभार्थी पात्रतेच्या पडताळणीमुळे काही महिलांच्या लाभावर परिणाम होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.