India Post Bonus : रेल्वेनंतर आता पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! ६० दिवसांच्या वेतनाइतका बोनस जाहीर

Post Office Employees : रेल्वेनंतर आता डाक विभागातल्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी ६० दिवसांच्या सॅलरीइतका बोनस जाहीर झाला आहे.
India Post Bonus
India Post Bonus saam tv
Published On: 

यंदा कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार आहे. भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस जाहीर झाल्यानंतर आता इंडिया पोस्टच्या कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळणार आहे. डाक विभागाच्या आदेशानुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी पात्र नियमित कर्मचाऱ्यांना ६० दिवसांच्या वेतनाइतका प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस (PLB) दिला जाणार आहे. या निर्णयाचा लाभ कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार आणि बोनसचं गणित कसं होणार, जाणून घेऊयात.

कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस?

डाक विभागाच्या आदेशानुसार, तीन श्रेणीतल्या पात्र कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

नियमित कर्मचारी - मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS), ग्रुप C आणि नॉन- गॅझेटेड ग्रुप B कर्मचारी यांना ६० दिवसांच्या सॅलरीच्या आधारे बोनस दिला जाईल.

ग्रामीण डाक सेवक (GDS) - नियमितपणे काम करणाऱ्या पात्र ग्रामीण डाक सेवकांना एक्स- ग्रेशिया बोनस मिळेल.

कंत्राटी स्वरुपात नाही, तर पात्र कॅज्युअल कर्मचारी - पात्र पूर्णवेळ कॅज्युअल कर्मचारी आणि टेम्पररी स्टेटस असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमानुसार अॅडहॉक बोनस दिला जाईल.

India Post Bonus
EPFO WhatsApp Channel: WhatsApp वर करा एक क्लिक अन् मिळवा PF ची संपूर्ण माहिती; वाचा प्रोसेस

बोनसची गणना कशी होणार?

नियमित कर्मचाऱ्यांच्या बोनसचे गणित ६० दिवसांच्या आधारे केली जाणार आहे. यासाठी पात्र मासिक वेतनाची मर्यादा ७,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

बोनसचे गणित पुढील सूत्रानुसार केलं जातं - बोनस = पात्र मासिक वेतन × बोनसचे दिवस ÷ ३०.४

मासिक पात्र सॅलरी ७,००० रुपये गृहीत धरल्याने ६० दिवसांच्या बोनस १३,८१५.७९ रुपये होतो. प्रत्यक्ष रक्कम कर्मचाऱ्याची पात्रता, वेतन आणि काम केलेल्या दिवसांनुसार ठरेल.

India Post Bonus
DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! महागाई भत्त्याबाबत मोदी सरकार मोठा निर्णय घेणार

कॅज्युअल कर्मचाऱ्यांसाठी काय नियम?

पात्र पूर्णवेळ कॅज्युअल कर्मचाऱ्यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत सलग तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वेळ काम केलेलं असणं आवश्यक आहे. तसेच १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राजीनामा, रिटायरमेंट किंवा अन्य कारणांमुळे सेवा सोडलेल्या काही पात्र नियमित कर्मचाऱ्यांनाही लागू नियमांनुसार बोनस मिळू शकतो.

तर केंद्र सरकारने रेल्वेच्या ११.४ लाख कर्मचाऱ्यांसाठी ७८ दिवसांच्या उत्पादकता आधारित बोनसची घोषणा केली आहे. यासाठी २,००९.६१ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. तर पात्र कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त म्हणजे १७,९५१ रुपयांपर्यंत बोनस मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com