

गेल्या काही दिवसांपासून सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक महागाई भत्ता वाढीची वाट पाहतायेत. त्यातच ऑल इंडिया डिफेंस एम्प्लॉइज फेडरेशन (AIDEF) ने केंद्र सरकारकडे DA आणि DR च्या लवकरात लवकर घोषणा कराव्यात अशी मागणी केली आहे. संघटनाने यांसंबंधित १० ऑक्टोबर रोजी कॅबिनेट सचिव आणि संबंधित मंत्रालयाला पत्र लिहिले होते. इतकंच नाही, तर AIDEF ने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या परफॉर्मेन्स लिंक्ड बोनस कॅलक्युलेशनसाठी सॅलरीमध्ये ७००० रुपयांची वाढ करून २१,००० रुपये करण्याची मागणी केली. जर सरकारने ही मागणी मान्य केली तर, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बोनसमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
AIDEF ने १० ऑक्टोबर रोजी कॅबिनेट सचिव आणि संबंधित मंत्रालयांना पत्र लिहून १ जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या महागाई भत्ता आणि महागाई सवलतीची घोषणा लवकरात लवकर करण्याची मागणी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA आणि पेन्शनधारकांचा DR सध्या ६० टक्के असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. जून २०२६ च्या AICPI-IW आकडेवारीच्या आधारे त्यात जवळरपास ३ टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र, अधिकृत घोषणा होईपर्यंत ही वाढ निश्चित मानता येणार नाही.
AIDEF ने परफॉर्मन्स लिंक्ड बोनसच्या गणनेसाठी सध्या लागू असल्याचं नमूद केलेली ७,००० रुपयांची वेतन मर्यादा वाढवून २१,००० रुपये करण्याची मागणी केली आहे. यामुळे पात्र कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या रकमेत वाढ होऊ शकते. यामध्ये ७,००० रुपयांच्या मर्यादेवर ३० दिवसांचा बोनस ६,९०८ रुपये होतो. ही मर्यादा २१,००० रुपये झाल्यावर २०,७२४ रुपये होऊ शकतो. म्हणजेच अंदाजे १३,८१६ रुपयांचा फरक पडू शकतो.
DA-DR वाढ आणि बोनसची सुधारित वेतन मर्यादा या दोन्ही मागण्यांवर केंद्र सरकारचा अंतिम निर्णय अद्याप महत्त्वाचा आहे. मागण्या मंजूर झाल्यावर कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळू शकतो. मात्र प्रत्यक्ष लाभ अधिकृत आदेश आणि लागू नियमांवर अवलंबून असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.