Sakshi Sunil Jadhav
गुडघ्यांच्या ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये इतर पुनर्वसन व्यायामांसोबत उलटं चालल्यावर वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते.
मागच्या दिशेने चालल्यामुळे पायांच्या काही स्नायूंना वेगळ्या पद्धतीने काम करावे लागते, ज्यामुळे त्यांची ताकद सुधारू शकते.
उलटे चालताना शरीराचा तोल सांभाळावा लागत असल्याने संतुलन आणि हालचालींमधला समतोल सुधारायला मदत होऊ शकते.
योग्य मार्गदर्शनाखाली केलेला हा व्यायाम गुडघ्यांच्या हालचाली आणि दैनंदिन कामे करण्याची क्षमता सुधारण्यास मदत करू शकतो.
पुढे चालण्याच्या तुलनेत उलटे चालताना पायांची हालचाल आणि गुडघ्यांवरील यांत्रिक भार बदलतो. मात्र त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा त्रास कमी होईलच असे नाही.
सुरुवातीला कमी वेळ आणि संथ गतीने चालावे; वेग वाढवण्यापेक्षा योग्य पद्धतीने चालण्याला प्राधान्य द्यावे.
सपाट, मोकळी आणि अडथळे नसलेली जागा निवडा; गरज असल्यास भिंतीचा किंवा प्रशिक्षकाचा आधार घ्या.
गुडघ्याला सूज, तीव्र वेदना, अस्थिरता किंवा चालताना तोल जाण्याचा त्रास असल्यास स्वतःहून हा व्यायाम सुरू करू नका.
गुडघेदुखीचे कारण प्रत्येक व्यक्तीत वेगळे असू शकते, त्यामुळे उलटे चालणे सुरू करण्यापूर्वी फिजिओथेरपिस्ट किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच साम टिव्ही याबातमीचे समर्थन अथवा दावा करीत नाही.