DA Hike: खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ; DA मध्ये थेट 'इतक्या' टक्क्यांची वाढ होणार

Central Government Employees Salary : तुम्ही सरकारी कामगार असाल तर तुमची दिवाळी गोड होण्याची शक्यता आहे. कारण महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
DA Hike Diwali
DA Hike 2026meta ai
Published On: 

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ताबाबत (DA) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या महागाी भत्त्यात ३ ते ४ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा झालेल्या नाहीत. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचं लक्ष आगामी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लागलं आहे.

सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ६० टक्के दराने महागाई भत्ता (DA) आणि महागाई राहत (DR) मिळत आहे. यामध्ये ३ टक्के वाढ झाल्यावर DA ६० टक्क्यांवरून ६३ टक्के होऊ शकतो. तर ४ टक्के वाढ झाल्याने तो ६४ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम दर सरकारच्या निर्णयानंतरच स्पष्ट होईल.

DA Hike Diwali
Navratri Horoscope : नवरात्रीत ग्रहांची स्थिती बदलणार नशीब! कोणत्या राशींचे भाग्य उजळणार? कुंभ राशीपासून या राशींच्या व्यक्तींचे अडथळे होणार दूर

महागाई भत्त्यात वाढ कशाच्या आधारे ठरते?

महागाई भत्त्यातली वाढ ठरवण्यासाठी औद्योगिक कामगारांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI-IW) महत्त्वाचा मानला जातो. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२६ मध्ये हा निर्देशांक १.२ अंकांनी वाढून १५४.४ वर पोहोचला. या आकडेवारीच्या आधारे जुलै २०२६ च्या DA वाढीबाबत ३ ते ४ टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला जातोय.

DA Hike Diwali
Bathing Tips : गरम, थंड की डेटॉलचे पाणी... त्वचेसाठी सर्वात बेस्ट कोणतं? वाचून थक्क व्हाल

पगारात किती वाढ होणार?

DA मध्ये ३ टक्के वाढ झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीनुसार महिन्याला मिळणारी जास्तीची रक्कम वेगवेगळी असेल.

- १८,००० रुपये बेसिक पे असल्यास दरमहा ५४० रुपये जास्त मिळू शकतात.

- २५,००० रुपये बेसिक पे असल्यास ७५० रुपयांची वाढ होऊ शकते.

- ३०,००० रुपये बेसिक पे असल्यास ९०० रुपये जास्त मिळतील.

- ४०,००० रुपये बेसिक पे असल्यास दरमहा १,२०० रुपयांचा फायदा होऊ शकतो.

- १ लाख रुपये बेसिक पे असल्यास ३,००० रुपये अतिरिक्त DA मिळू शकतो.

जुलैपासून वाढ लागू झाल्यावर एरियर मिळणार का?

सरकारने DA वाढ जुलै २०२६ पासून लागू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांच्या फरकाची थकबाकी म्हणजेच एरियर मिळण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये मंजुरी मिळाल्यास हा फरक पुढच्या सॅलरीसोबत दिला जाऊ शकतो. मात्र, एरियरची तारीख आणि प्रत्यक्ष सॅलरी याबद्दल अधिकृत आदेशाची वाट पाहावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com