

DA Hike News: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. महागाई भत्त्याबाबत (DA Hike) नुकतीच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ६० टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय, त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. असं झालं तर महागाई भत्ता ६४ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र, याबद्दल केंद्र सरकारकडून अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.
केंद्रीय मंत्रिमंडळाची पुढची नियमित बैठक बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी होण्याची शक्यता आहे. या बैठकीत महागाई भत्त्याच्या वाढीबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. पण बैठकीत DA वाढीचा प्रस्ताव मांडला जाईल किंवा त्याला मंजुरी मिळेल, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी यंदा ४ टक्के DA वाढीची अपेक्षा व्यक्त केली आहे.त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयाकडे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचं लक्ष लागलं आहे.
सध्या महागाई भत्ता मूळ सॅलरीच्या ६० टक्के आहे. त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ झाल्यावर तो ६४ टक्के होईल. ही वाढ प्रत्यक्षात मंजूर झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या सॅलरीमध्ये वाढ होऊ शकते.
उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी ३०,००० रुपये असेल तर ४ टक्के वाढीमुळे महिन्याला १,२०० रुपयांचा जास्तीचा महागाई भत्ता मिळू शकतो. हे गणिक फक्त उदाहरणासाठी आहे. प्रत्यक्ष लाभ हा तुमच्या बेसिक सॅलरीवर अवलंबून असेल.
महागाई भत्त्याप्रमाणेच पात्र केंद्रीय पेन्शनधारकांना महागाई राहत (DR) दिली जाते. DA आणि DR मध्ये वाढ मंजूर केल्यावर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना त्याचा लाभ मिळू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.