PM Kisan Yojana : खुशखबर! दसरा-दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२,००० येणार, महत्त्वाची अपडेट समोर

PM Kisan 24th Installment : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दसरा-दिवाळी आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
PM Kisan Yojana
PM Kisan Yojana meta ai
Published On: 

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी विविध योजना राबवत असतं. त्यातीलच एक योजना म्हणजे पीएम किसान योजना आहे.

देशातले लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. याच संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २,००० रुपये जमा होणार का, अशा चर्चा सुरू आहेत. मात्र, २४ व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.

PM Kisan Yojana
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना कधीपासूनचा एरियर मिळणार? समोर आली महत्त्वाची अपडेट

पीएम किसान योजनेचा २४वा हप्ता कधी मिळणार?

पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते. साधारणपणे प्रत्येक चार महिन्यांनी एक हप्ता जमा केला जातो.

PM Kisan Yojana
Petrol Price Hike : दिवाळीआधी इंधनाचा भडका! पेट्रोल-डिझेल महागणार? निवडणुकांआधी सर्वसामान्यांना बसणार शॉक

दिलेल्या माहितीनुसार, योजनेचा २३ वा हप्ता २० जून रोजी खात्यात जमा करण्यात आला होता. त्यामुळे पुढच्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र २४ वा हप्ता दसरा- दिवाळीआधीच मिळेल असं सांगण्यात येत नाही. शेतकऱ्यांनी अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे.

वर्षाला मिळतात ६,००० रुपये

पीएम किसान सन्मान निधी योजना १ डिसेंबर २०१८ पासून लागू करण्यात आली. या योजनेचा उद्देश पात्र शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत मिळावी हा आह. या योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थ्यांना एकूण ४.४७ लाख कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. तुम्ही याची माहिती किंवा सूचना अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर तपासू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com