8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना कधीपासूनचा एरियर मिळणार? समोर आली महत्त्वाची अपडेट

8th Pay Commission Arrears: सरकारी कर्मचाऱ्यांच्या एरियरबाबतीत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. थकबारी मिळणार की नाही, किती मिळणार आणि कधी मिळणार, हे केंद्र सरकारच्या अंतिम निर्णयानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
8th Pay Commission
8th Pay Commissionsaam tv
Published On: 

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नव्या वेतनश्रेणीची वाट सध्या कर्मचारी करत आहेत. पगारात किती वाढ होणार आणि जानेवारी २०२६ पासून पगाराची थकबाकी (एरियर) मिळणार का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात आहेत. मात्र,याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही.

आठव्या वेतन आयोगाची नवीन वेतनरचना १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे. जवळपास दहा वर्षांच्या अंतराने नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जातात. मात्र, यावेळी नवीन वेतनरचना नेमकी कधी लागू होणार, याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही.

8th Pay Commission
Petrol Price Hike : दिवाळीआधी इंधनाचा भडका! पेट्रोल-डिझेल महागणार? निवडणुकांआधी सर्वसामान्यांना बसणार शॉक

कर्मचाऱ्यांना एरियर मिळणार का?

जर सरकारने नवीन वेतनरचना १ जानेवारी २०२६ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्यक्ष वाढीव पगाराचे वितरण नंतर सुरू केलं, तर कर्मचाऱ्यांना मागच्या महिन्याची थकबाकी मिळण्याची शक्यता आहे. पण एरियर मिळणार की नाही, तो किती महिन्यांचा असेल आणि त्याचं वितरण कधी होईल, हे सरकारच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असेल.

सध्या आयोग कर्मचारी संघटना आणि विविध युनियनशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेत आहे. दिल्ली,बेंगळुरू, ओडिशा, लडाख आणि उत्तर प्रदेशासोबत अनेक ठिकाणी बैठका झाल्या आहेत. आयोगाच्या वेबसाइटनुसार पुढची बैठक २२ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार आहे. या चर्चांमध्ये फिटमेंट फॅक्टर, मूळ वेतन, भत्ता आणि पेन्शन यांसारख्या मुद्यांचा समावेश आहे.

8th Pay Commission
WhatsApp New Feature: WhatsApp चं भन्नाट फीचर! अकाउंट नसलेल्या व्यक्तींनाही करता येणार कॉल

मागील वेतन आयोगांचा अनुभव काय?

यापुर्वी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आल्या होत्या. त्याआधीच्या वेतन आयोगांमध्येही अंमलबजावणीला वेगवेगळा कालावधी लागला होता आणि थकबाकीचं वितरणही करण्यात आलं होतं. महत्त्वाचं म्हणजे आठव्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांना सध्या सरकारच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे. नवीन वेतनश्रेणी, फिटमेंट फॅक्टर आणि एरियरबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतरच कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष लाभ किती मिळेल, हे स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com