Sakshi Sunil Jadhav
WhatsApp हा आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग झाला आहे. यामध्ये सतत नवीन फिचर्स येत आहेत. जेणेकरून युजर्सला त्याचा पुरेपूर वापर करता येईल. सध्या गेस्ट कॉल फीचरची जोरदार चर्चा सुरू आहे.
WhatsApp गेस्ट कॉल फीचरची माहिती एका ब्लॉगपोस्टद्वारे देणयाक आली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी WhatsApp अकाउंट नसतानाही तुम्ही या फिचरचा वापर करू शकतो.
तुम्ही WhatsApp वर कॉल लिंक तयार करून इतरांसोबत शेअर करू शकता.
गेस्ट कॉलसाठी लिंक WhatsApp वापरणाऱ्या युजरलाच तयार करता येईल.
लिंकच्या मदतीने WhatsApp न वापरणाऱ्या व्यक्तींनाही ग्रुप कॉलमध्ये सहभागी होता येऊ शकतं.
गेस्ट लिंकच्या मदतीने कॉलवर सहभागी होण्यासाठी कॉल होस्टची मंजुरी घ्यावी लागू शकते. त्यासाठी गेस्ट युजरला प्रत्येक वेळी कॉलमध्ये सहभागी होण्याची गरज नाही.
गेस्ट कॉलमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींना उपलब्ध ऑडिओ कॉल सुविधांचा वापर करता येऊ शकतो.
तुम्ही हे फीचर WhatsAppच्या अधिकृत सूचनेनंतर वापरू शकता.