Sakshi Sunil Jadhav
घरात येणाऱ्या पाण्यामुळे नळांवर पांढरे डाग पडतात, भांडी चमकदार राहत नाहीत आणि गिझरमध्ये खनिजांचा थर साचत असेल तर पुढच्या टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत.
गिझरमध्ये खनिजांचा थर साचल्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळोवेळी सर्व्हिसिंग करून घ्या.
नळ, शॉवर आणि सिंकवरील पांढरे डाग काढण्यासाठी व्हिनेगर उपयोगी ठरू शकते. मात्र पृष्ठभागांवर त्याचा वापर टाळा.
कडक पाण्यात साबणाचा फेस कमी होतो. त्यामुळे कपडे धुण्यासाठी योग्य डिटर्जंट आणि उत्पादकाने सुचवलेले प्रमाण वापरा.
काही प्रकारच्या कडक पाण्याची कठीणता उकळल्याने कमी होते. मात्र कायमस्वरूपी कठीणता दूर होत नाही.
घरातील कडक पाणी मऊ करण्यासाठी वॉटर सॉफ्टनर उपयोगी ठरू शकतो. पाण्याची गुणवत्ता तपासून योग्य उपकरण निवडा.
RO प्युरिफायर पाण्यातील विरघळलेली अनेक खनिजे कमी करू शकतो. मात्र, प्युरिफायर निवडताना पाण्याची गुणवत्ता लक्षात घ्या.
बेकिंग सोडा पाण्यातले कॅल्शियम आणि मॅग्नेशियम काढून टाकण्याचा खात्रीशीर उपाय नाही.
लिंबाच्या रसातील आम्लामुळे काही पृष्ठभागांवरील खनिजांचे डाग कमी होऊ शकतात. मात्र, त्यामुळे पाण्याची कठीणता कायमस्वरूपी दूर होत नाही.