

प्रत्येकालाच भविष्यासाठी पैसे जमा करायचे असतात. त्यासाठी विविध बैकांमध्ये आपापल्या सोयीनुसार गुंतवणूक केली जाते. गुंतवणूक करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो, तो म्हणजे कुठल्या योजनेतून जास्त परतावा मिळेल? पुढील बातमीत आपण पोस्टाच्या जबरदस्त परतावा देणाऱ्या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. त्याने तुम्हाला भविष्यात मोठा परतावा मिळू शकतो.
तुम्ही नवरा-बायको मिळून जर गुंतवणूक करणार असाल तर पोस्टाची मंथली इनकम योजना (Post Office MIS Scheme) तुमच्यासाठी बेस्ट आहे. यामध्ये नवरा-बायको महिन्याला ९,२५० रुपयांची कमाई करू शकतात. या योजनेची सरकारही हमी देतं. Post Office Monthly Income Scheme-MIS मध्ये ७.४० टक्के इतकं व्याज दिलं जातं. या योजनेची मॅच्युरिटी ५ वर्षांनी होते आणि यामध्ये १८ वर्षांनंतर कोणीही गुंतवणूक करू शकतं.
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीममध्ये १००० रुपयांपासून गुंतवणूक करता येते. तुम्ही यामध्ये सिंगल आणि संयुक्त असं दोन्ही प्रकारचं खातं उघडू शकता. सोबत काही महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. तुम्ही जवळच्या पोस्टात जाऊन आवश्यक माहिती देऊन हे खातं उघडू शकता. ही योजना एक वेळ गुंतवणुकीची योजना आहे आणि एकरकमी गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला मासिक उत्पन्न मिळायला सुरुवात होते. खातं उघडल्यानंतर पुढच्या महिन्यापासून व्याज मिळायला सुरूवात होते आणि ते मॅच्युरिटीपर्यंत सुरू राहते.
तुम्ही या योजनेअंतर्गत एका खात्यात एकाच वेळी ९ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. पण जर तुमचं संयुक्त खातं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त १५ लाख गुंतवू शकता. अट अशी आहे की गुंतवणुकीत दोघांचा समान वाटा असावा. खातं उघडल्यापासून एक ते तीन वर्षांच्या आत बंद केलं तर, मुद्दलातली २% रक्कम कापली जाईल. जर खाते तीन ते पाच वर्षांच्या दरम्यान बंद केले, तर १% रक्कम कापली जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.