DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 8% वरून थेट 44% वर, कोणत्या राज्यात घेतला निर्णय

Government Employees : त्रिपुरा सरकारने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता ८ टक्क्यांवरून ४४ टक्के केला आहे.
DA Hike Diwali
DA Hike 2026meta ai
Published On: 

सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. त्रिपुरा सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) मोठी वाढ केली. जुलै २०२२ मध्ये ८ टक्के असलेला महागाई भत्ता आता वाढवून ४४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे कर्मचारी आणि रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (Tripura Government Employees Get 44% DA) महत्त्वाचं म्हणजे, राज्यात आठवा वेतन आयोग लागू करण्याबद्दलही सरकार सकारात्मक विचार करत असल्याची माहिती डॉ. माणिक साहा यांनी दिली आहे.

८ टक्क्यांवरून DA थेट ४४ टक्क्यांवर

त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांनी रविवारी २२ नोव्हेंबर रोजी आगरतळा येथील मुक्तधारा ऑडिटोरियममध्ये जेष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांच्या संमेलनाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी महागाई भत्त्यातल्या वाढीची माहिती दिली आहे.

DA Hike Diwali
Ladki Bahin Yojana : ८ दिवसांत नोव्हेंबर संपणार, लाडक्या बहिणीला ऑक्टोबरचा १५०० चा हप्ता कधी मिळणार?

जुलै २०२२ मध्ये त्रिपुरा सरकारी कर्मचाऱ्यांना ८ टक्के महागाई भत्ता मिळत होता. त्यानंतर सरकारने वेळोवेळी वेगवेगळ्या टप्प्यात DA मध्ये वाढ केलीये. आता हा महागाई भत्ता ४४ टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजेच गेल्या चार वर्षात DA मध्ये एकूण ३६ टक्क्यांची वाढ झाली आहे. या निर्णयाचा फायदा राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे.

DA Hike Diwali
PM Kisan Yojana : ही ७ कामं करा अन्यथा रखडणार पीएम किसानचा हप्ता, वाचा सविस्तर

केंद्र आणि राज्य कर्मचाऱ्यांमधला DA मधले अंतर कमी होणार?

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या ६० टक्के महागाई भत्ता मिळत असल्याचं या माहितीत नमूद केलं आहे. तर त्रिपुरा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ४४ टक्के DA मिळतायेत. त्यामुळे दोघांच्या महागाई भत्त्यामध्ये १६ टक्क्यांचं अंतर आहे. हे अंतर कमी करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री माणिक साहा यांनी स्पष्ट केलं. याआधी हे अंतर जास्त होतं. पण सरकारच्या निर्णयांमुळे त्यात घट झाली.

मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार, राज्य सरकारचे बजेट गेल्या काही वर्षांत १७ हजार कोटी रुपयांवरून वाढून जवळपास ३२ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. राज्याची आर्थिक क्षमता आणि उपलब्ध संसाधनांचा आढावा घेतल्यानंतर कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता त्रिपुरातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष 8व्या वेतन आयोगाबाबत सरकार काय निर्णय घेते, याकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.