

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी संघटनांनी पगार, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये मोठे बदल करण्याची मागणी केली आहे. यामध्ये सध्या मिळणारी ३ टक्के वार्षिक पगारवाढ थेट ६ टक्के करण्याची मागणी आहे.तसेच जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा लागू करावी आणि महागाई भत्त्याचा (DA) ५० टक्के हिस्सा मूळ पगारात जोडावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. या मागण्या मान्य झाल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासोबत रिटायरमेंटनंतर मिळणाऱ्या सुविधांमध्येही बदल होऊ शकतो.
भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने (BPMS) १८ नोव्हेंबर २०२६ रोजी आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान आपलं मागणीपत्र सादर केलं. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन, भत्ता आणि इतर सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर दरवर्षी ३ टक्के इन्क्रिमेंट मिळते. पण ही वाढ ६ टक्के करावी अशी मागणी संघटनेने केली. वाढती महागाई आणि दैनंदिन खर्च लक्षात घेऊन पगारवाढीचं प्रमाण वाढवणं गरजेचं असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे.
महागाई भत्त्याचा (DA) ५० टक्के हिस्सा मूळ वेतन आणि पेन्शनमध्ये विलीन करण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ व्हायसा मदत होऊ शकते.
NPS आणि UPS योजना बंद करून कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना (OPS) परत सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच किमान ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस आणि DA देण्याचाही प्रस्ताव आहे.
CGEGIS विमा संरक्षण ३० हजार रुपयांवरून १५ लाख रुपये करण्याची मागणी संघटनेने केली आहे. DLI विमा लाभ १० लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आयोगाने दिला आहे. त्यासोबत कॅज्युअल सुट्ट्या ८ वरून १२ दिवस करण्याची मागणी, चाइल्ड केअर लीव्ह दोन वर्षांपर्यंत वाढवण्याची मागणी, महिलांसाठी दर महिन्याला एक दिवस मासिक पाळीची रजा देण्याची मागणीही कर्मचारी संघटनांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.