LPG Insurance : गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यास किती लाखांचा विमा मिळतो? ग्राहकांना माहिती आहे का?

Gas Cylinder Blast : घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट किंवा गळती झाल्याने ग्राहकांना लाखोंचा विमा संरक्षण मिळू शकते.
LPG Insurance
LPG Insurance saam tv
Published On: 

घरगुती स्वयंपाकासाठी जवळपास प्रत्येक घरात LPG गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. पण गॅस गळती किंवा सिलिंडरचा स्फोट झाल्यावर मोठी दुर्घटना घडू शकते. अशा दुर्घटनेत जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झाल्यावर ग्राहकांना विम्याच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळू शकते, याची अनेकांना माहिती नसते. महत्त्वाचं म्हणजे, घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी तेल कंपन्यांकडून सार्वजनिक दायित्व विमा (Public Liability Insurance) उपलब्ध असतो.

गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यास किती लाखांचा विमा मिळतो?

घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी विम्याची तरतूद आहे. अपघातात मृत्यू झाल्यास प्रति व्यक्ती ६ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळू शकते. वैद्यकीय उपचारांसाठी प्रति दुर्घटना ३० लाख रुपयांपर्यंत आणि प्रति व्यक्ती २ लाख रुपयांपर्यंत खर्चाची तरतूद आहे. याशिवाय नोंदणीकृत घरातील मालमत्तेच्या नुकसानीसाठी २ लाख रुपयांपर्यंत भरपाई मिळू शकते. वैद्यकीय उपचारांसाठी प्रति व्यक्ती २५ हजार रुपयांपर्यंत तातडीची मदत मिळण्याचीही तरतूद आहे. प्रत्यक्ष दावा विमा पॉलिसीच्या अटींनुसार मंजूर केला जातो.

LPG Insurance
Chanakya Niti : कामापुरता मामा म्हणणाऱ्या ५ प्रकारच्या लोकांपासून राहा सावध! चाणक्यांनी सांगितली ओळख

विम्याचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्या अटी आहेत?

ग्राहकाचे एलपीजी कनेक्शन अधिकृत गॅस वितरकाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. अपघाताचे कारण एलपीजी गळती किंवा एलपीजीमुळे लागलेली आग असणे महत्त्वाचे आहे. मालमत्तेच्या नुकसानीसाठी अपघात ग्राहकाच्या नोंदणीकृत पत्त्यावर झालेला असणे आवश्यक आहे. प्रत्येक विमा दावा तपासणी आणि विमा पॉलिसीच्या अटींनुसार मंजूर केला जातो.

विम्याचा दावा कसा करायचा?

गॅस सिलिंडरचा अपघात झाल्यास सर्वप्रथम संबंधित गॅस वितरकाला तातडीने लेखी स्वरूपात माहिती द्यावी. त्यानंतर वितरक संबंधित तेल कंपनीला कळवतो आणि तेल कंपनी विमा कंपनीकडे पुढील प्रक्रिया करते. मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र आणि पोस्टमार्टम रिपोर्ट, जखमी झाल्यास रुग्णालयाची बिले, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आणि डिस्चार्ज कार्ड यांसारखी कागदपत्रे आवश्यक असू शकतात.

LPG Insurance
Mens Mental Health : घराचा आधार असलेले पुरुष आतून का तुटतात? भावना लपवण्याचे तोटे नक्की वाचा

ग्राहकांनी कोणती काळजी घ्यावी?

गॅस सिलिंडर नेहमी अधिकृत वितरकाकडूनच घ्यावा. गॅस पाइप आणि रेग्युलेटरची नियमित तपासणी करावी. गॅसचा वास आल्यास रेग्युलेटर बंद करून दरवाजे आणि खिडक्या उघडाव्यात. मॅचस्टिक, लायटर किंवा इलेक्ट्रिक स्विचचा वापर करू नये. गॅस गळतीसाठी 1906 या आपत्कालीन हेल्पलाइनवर संपर्क साधावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.