Sakshi Sunil Jadhav
माणसाचा स्वभाव ओळखून त्याच्याशी व्यवहार करणं महत्त्वाचं आहे. जाणून घ्या, कामापुरतंच जवळ येणाऱ्या ५ प्रकारच्या लोकांची ओळख.
आयुष्यात इतरांना मदत करणं ही चांगली सवय आहे. पण प्रत्येक व्यक्ती तुमच्या मदतीची आणि भावनांची कदर करेलच असं नाही. काही लोकांना फक्त स्वतःचं काम असतानाच तुमची आठवण येते. अशा व्यक्तींपासून सावध राहा.
गरज पडली की मदत मागतात, पण काम झाल्यानंतर तुमचा आदर करत नाहीत. सतत अपमान करणाऱ्यांपासून लांब राहा.
स्वतःचा फायदा असेपर्यंतच तुमच्याशी जवळीक ठेवतात. काम पूर्ण झाल्यावर त्यांचा व्यवहार बदलतो आणि ते दुर्लक्ष करू लागतात.
प्रत्येक समस्येवर तुम्हीच उपाय शोधा, अशी त्यांची अपेक्षा असते. मदत करणं चांगलं. पण दुसऱ्यांच्या प्रत्येक जबाबदारीचं ओझं स्वत:वर घेऊ नका.
रोज ती चूक करून प्रत्येक वेळी दुसऱ्यांकडून मदतीची अपेक्षा करतात. स्वत:च्या सवयी बदलण्याची तयारी नसलेल्या लोकांवर सतत वेळ खर्च करू नका.
दुसऱ्यांनी केलेल्या मदतीला ते उपकार न मानता आपला अधिकार समजून बसतात. तुमच्या भावना आणि मेहनतीची कदर न करणाऱ्या लोकांपासून लांब राहा.
कोणाला किती आणि कशी मदत करायची, हे समजून निर्णय घ्या. संकटाच्या काळात कोण तुमच्या सोबत उभं राहतं, यावरून नात्यांची खरी किंमत समजते.