

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली. दिवाळी संपला तरीही आठव्या वेतन आयोगाने पगारवाढीची घोषणा केलेली नाही. अशातच कर्मचारी संघटनेने वेतन, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये मोठे बदल करण्याची मागणी केली. यामध्ये सध्याची १८ हजार रुपये बेसिक सॅलरी ६९ हजार रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच पेन्शन ५० टक्क्यांवरून ६७ टक्के आणि वार्षिक इन्क्रिमेंट ३ टक्क्यांवरून ६ टक्के करण्याची मागणी करण्यात आली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रमुख संघटना नॅशनल कौन्सिल (स्टाफ साइड) जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (NC-JCM) यांनी आठव्या वेतन आयोगाकडे आपल्या शिफारशी सादर केल्या होत्या. यामध्ये बेसिक सॅलरी १८ हजारांवरून ६९ हजार रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी ३.८३३ फिटमेंट फॅक्टर प्रस्तावित करण्यात आला. तसेच पे-लेव्हल २ आणि ३ एकत्र करून नवीन वेतनश्रेणी तयार करण्याची मागणीही करण्यात आली.
रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या सॅलरीच्या ५० टक्क्यांऐवजी ६७ टक्के पेन्शन देण्याची मागणी करण्यात आलीये. तर फॅमिली पेन्शन ३० टक्क्यांवरून ५० टक्के करण्याचा प्रस्ताव केला. तसेच वार्षिक वेतनवाढ ३ टक्क्यांऐवजी ६ टक्के करण्याची मागणी आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.
सध्या शहरांच्या श्रेणीनुसार ३० , २० आणि १० टक्के HRA दिला जातो. हा दर अनुक्रमे ४०, ३५ आणि ३० टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. यासोबतच रिटायरमेंटच्या वेळी मिळणाऱ्या रजा रोखीकरणाची मर्यादा ३०० दिवसांवरून ६०० दिवस करण्याची मागणी करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.