

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या आठव्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहतायेत. नवीन वेतन आयोग लागू झाल्यावर आपला पगार किती वाढणार, हातात किती पैसे येणार आणि किती थकबाकी मिळेल, असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांना पडलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, यासाठी तुम्हाला कोणत्याही ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. काही सोप्या गणितांच्या मदतीने तुम्ही स्वतःच नवीन पगाराचा अंदाज लावू शकता.
आठव्या वेतन आयोगासाठी १.९२ फिटमेंट फॅक्टरचं उदाहरण सध्या चर्चेत आहे. पण हा अंतिम सरकारी निर्णय नाही. हा संभाव्य आकडा आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पगारवाढ सरकारच्या अंतिम निर्णयानुसार ठरणार आहे.
1. नवीन बेसिक सॅलरी: सध्याच्या मूळ वेतनाला फिटमेंट फॅक्टरने गुणलं जातं. उदाहरणार्थ, 18,000 रुपये बेसिक पगार असेल तर १.९२ फिटमेंट फॅक्टरनुसार नवीन बेसिक ३४,५६० रुपये होईल.
2. HRA मोजणी: शहराच्या X, Y आणि Z श्रेणीनुसार घरभाडे भत्ता ठरतो. उदाहरणार्थ, 30 टक्के HRA असल्यास ३४,५६० रुपयांवर १०,३६८ रुपये मिळतील.
3. ट्रान्सपोर्ट अलाउन्स: कर्मचाऱ्याच्या पे-लेव्हल आणि शहरानुसार प्रवास भत्ता दिला जातो.
4. ग्रॉस सॅलरी: नवीन बेसिक, HRA, ट्रान्सपोर्ट अलाउन्स आणि लागू असलेले इतर भत्ते एकत्र केल्यावर ग्रॉस सॅलरी मिळते.
5. NPS कपात: पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनातून नियमानुसार NPS योगदानाची कपात होते.
6. CGHS कपात: आरोग्य योजनेचे लागू असलेले मासिक शुल्क वजा केले जाते.
7. इन्कम टॅक्स: वार्षिक उत्पन्न आणि लागू कर नियमांनुसार आयकराची गणना होते.
8. नेट सॅलरी: ग्रॉस सॅलरीमधून NPS, CGHS आणि इतर लागू कपाती वजा केल्यानंतर हातात मिळणारा पगार निश्चित होतो.
नवीन वेतन आयोगाची प्रभावी तारीख आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची तारीख वेगळी असेल तर पात्र कर्मचाऱ्यांना नियमानुसार थकबाकी मिळू शकते. पण एरियरची रक्कम अंतिम वेतनश्रेणी, लागू तारीख आणि सरकारी निर्णयावर अवलंबून असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.