High Cholesterol : कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी आहारात करा 'या' फळांचा समावेश

Sakshi Sunil Jadhav

उच्च कोलेस्ट्रॉल

बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेकांना उच्च कोलेस्ट्रॉलची समस्येला सामोरं जावं लागत आहे.

fruits to lower cholesterol

भविष्यातल्या समस्या

खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यावर चरबीचा थर जमा होण्याचा धोका, मेंदूला कमी रक्त पुरवठा, रक्ताच्या गाठी, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे या समस्या वाढतात.

fruits to lower cholesterol

सफरचंद

सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचे विद्राव्य फायबर असतं. हे आतड्यांमधले कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी करण्यास मदत करते. त्यामुळे सफरचंद सालीसकट खाणं फायदेशीर ठरतं.

LDL cholesterol

संत्री

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी मदत करू शकतात.

bad cholesterol

पेर

पेरमध्ये विद्राव्य आणि अविद्राव्य फायबर असतं. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवायला मदत होते. तसेच पोट जास्त वेळ भरलेलं राहतं.

bad cholesterol

ॲव्होकॅडो

ॲव्होकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असतं. लोणी किंवा तुपासारख्या संतृप्त चरबीयुक्त पदार्थांच्या जागी मर्यादित प्रमाणात ॲव्होकॅडो खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं.

lower LDL naturally

जांभूळ

जांभळामध्ये फायबर आणि अँथोसायनिनसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे शरीरातील पेशींचे ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण होतं. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी जांभूळ फायदेशीर ठरू शकते.

cholesterol control diet

केळी

केळ्यामध्ये फायबर आणि पोटॅशियम असते. फायबरमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणास मदत होते, तर पोटॅशियम रक्तदाब संतुलित ठेवलायला हातभार मिळतो. त्यामुळे केळ्याचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरू शकते.

cardiovascular health

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

cholesterol prevention

NEXT: दिवाळीच्या धावपळीमुळे जाणवतोय थकवा आणि आळस? मग घरीच करा हे ७ सोपे उपाय

Diwali Fatigue | Saam Tv
येथे क्लिक करा