

मायक्रोसॉफ्ट आणि मेटा कंपनी करणार कर्मचारी कपात
एआयवरील वाढता खर्च लक्षात घेता महत्त्वाचे पाऊल
२३,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार?
जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक म्हणजे मायक्रोसॉफ्ट लवकरच महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. कंपनीत महत्त्वाचे बदल केले जाणार आहे. याचा परिणाम हजारो कर्मचाऱ्यांवर होऊ शकतो. Meta Platforms आणि Microsoft महत्त्वाचे बदल करण्याचे ठरवले आहे. यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.
कर्मचारी कपातीचं कारण काय? (Meta Microsoft Layoff Reason)
आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजे (AI) वर खर्च वाढत आहे. यामुळे इतर खर्च कमी करण्यासाठी आणि कंपनीचे काम अधिक चांगले करण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी महत्त्वाची पाऊले उचलले आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, कंपनीच्या या निर्णयाचा परिणाम जवळपास २३,००० नोकऱ्यांवर होऊ शकतो.
मेटा प्लॅटफॉर्म कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे मायक्रोसॉफ्ट आपल्या कर्मचाऱ्यांना स्वैच्छिक निवृत्ती घेण्याचा प्रस्ताव देत आहे. यामुळे टेक इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपातीचे सावट आहे. मेटा आणि मायक्रोसॉफ्टने आपला खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्ास सुरुवात केली आहे.
मेटाने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेमोमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांपैकी १० टक्के म्हणजे ८००० कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे. ही प्रोसेस २० मेपासून सुरु होईल. याशिवाय कंपनी अंदाजे ६००० पदे भरणार नाही. यामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.
मायक्रोसॉफ्टने अमेरिकेतली कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक सेवानिवृत्ती योजना सुरु केली आहे. अहवालानुसार, १,२५,००० कर्मचाऱ्यांपैकी ७ टक्के म्हणजेच ८,७५० कर्मचारी यासाठी पात्र ठरु शकतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची संख्यादेखील कमी होणार आहे. जवळपास २३,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता वर्तवली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.