Unacademy Layoff: Unacademy ने ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, कारण ऐकून तुमचीही चिंता वाढेल!

Unacademy Layoff 600 Employees: ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी तयार करण्यात आलेली Unacademy कंपनीने ६०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. कर्मचारी कपातीची ही तिसरी वेळ आहे.
Unacademy Layoff
Unacademy LayoffSaam Tv

ऑनलाइन क्लासेसमध्ये Unacademy खूप मोठे नाव आहे. Unacademy या स्टार्टअप कंपनीतून कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. जवळपास ६०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यात आले आहे. म्हणजेच कंपनीने जवळपास १० टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. यात तंत्रज्ञान, मार्केटिंग, सेल्स या विभागातील कर्मचारी आहे.

Unacademy Layoff
Petrol Diesel Rate Today : महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर

Unacademy कंपनीने १५ जूनपासून कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरुवात केली. ३० जून रोजी ६०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले. मिडिया रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या स्टार्टअरमध्ये ३,८५० कर्मचारी कार्यरत होते. हे कर्मचारी २०२२ च्या तुलनेत ४२ टक्क्यांनी कमी आहेत.

एप्रिल २०२२ मध्ये Unacademy मध्ये कंपनीच्या खर्चात कपात करण्यासाठी १००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले होते. मार्च २०२३ मध्ये ३५० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांची कपात करण्याची चौथी फेरी आहे.

Unacademy ने prepladder या कंपनीलादेखील टेकओवर केले होते. याच कंपनीच्या विक्री धोरणाचा भाग म्हणून १४५ कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. Unacademy जुलै २०२० मध्ये ५० दशलक्ष डॉलर्सला prepladder विकत घेतले होते.

Unacademy Layoff
Gold Silver Rate : सोन्यासह चांदीच्या किंमतीत मोठी वाढ; वाचा महाराष्ट्रातील नवे दर

Unacademy ने २०२३ मध्ये ४० टक्के कर्मचाऱ्यांना कमी केले होते. त्यामुळे कंपनीला १,७८ कोटींचा तोटा सहन करावा लागला. अनअकॅडमी कंपनीने आतापर्यंत ३ वेळा कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. त्यामुळे कंपनीला वारंवार तोटा सहन करावा लागत आहे.

Unacademy Layoff
ITR Filling Last Date: इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख माहितीये का? मुदतीत भरला नाही तर भरावा लागेल दंड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com