ITR Filling Last Date: इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख माहितीये का? मुदतीत भरला नाही तर भरावा लागेल दंड

ITR Filling Last Date: देशातील सर्व कर्मचाऱ्यांना आयटीआर भरायचा असतो. आयटीआर न भरल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.आयटीआर भरण्याची शेवटची तारीख कधी आहे ते जाणून घ्या.
ITR Filling Last Date
ITR Filling Last DateSaam tv

प्रत्येक कर्मचाऱ्याने आयटीआर भरायचा असतो. आयकर रिटर्न करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. जर तुम्ही ३१ जुलैपर्यंत आयकर रिटर्न फाइल केले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. वेळेत आयटीआर फाइल केल्याने अनेक फायदे होतात. जर तुमची टॅक्सेबल इन्कम असेल तर तुम्हाला वेळेवर रिवाइज रिटर्न फाइल करण्याची संधी मिळते. याचसोबत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड लागू होणार नाही. जर तुम्ही अंतिम मुदतीच्या आधी आयटीआर भरला नाही तर इन्कम टॅक्स सेक्शन 234A अंतर्गत इंटरेस्ट आणि सेक्शन 234F अंतर्गत दंड भरावा लागेल.

ITR Filling Last Date
Gold-Silver Rate Today : जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या किंमती कमी झाल्या; वाचा तुमच्या शहरातील आजचा भाव

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. १ एप्रिलपासून आयटीआर फाइल करण्यास सुरुवात झाली आहेत. तुम्हीही वेळेत आयटीआर फाइल करावा. जर तुम्ही वेळेत आयटीआर फाइल केला नाही तर तुम्हाला १ हजार ते ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. तसेच टॅक्सेबल इन्कम ५ लाख असेल तर त्यावर तुम्हाला ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. तर १ लाखाच्या किमतीवर १ हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

ITR Filling Last Date
Petrol Diesel Rate Today: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर; मुंबई, पुण्यात आजचा भाव काय? जाणून घ्या

जर तुम्ही वैयक्तिक इन्कम टॅक्स फाइल करत असाल तर त्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. तर कॉर्पोरेट आणि इतर लोकांना ऑडिटिंग करावी लागते. या लोकांसाठी आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर आहे.

ITR Filling Last Date
LPG Cylinder Price Cut : खुशखबर! गॅस सिलिंडरच्या दरात कपात, जुलैच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com