RBI On HSBC: एचएसबीसी बँकेला आरबीआयचा दणका, ठोठावला मोठा दंड; जाणून घ्या कारण?

Reserve Bank of India's Action Against HSBC Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एचएसबीसीला 29.6 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामागे नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या...
HSBC बँकेला आरबीआयचा दणका, ठोठावला मोठा दंड; जाणून घ्या कारण?
RBI Action Against HSBC BankSaam TV

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेडवर (HSBC) कार्डशी संबंधित काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल 29.6 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, बँकांच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि रुपी डिनोमिनेटेड को-ब्रँडेड प्रीपेड कार्ड ऑपरेशन्सवर आरबीआयने जारी केलेल्या काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल एचएसबीसीला हा दंड ठोठावण्यात आला आहे.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2022 रोजी बँकेच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी वैधानिक तपासणी (ISE 2022) करण्यात आली. आरबीआयच्या निर्देशांचे पालन केले नसल्याचे यात आढळून आले.

HSBC बँकेला आरबीआयचा दणका, ठोठावला मोठा दंड; जाणून घ्या कारण?
Rule Changes from July 2024: जुलै महिन्यात होणार अनेक मोठे बदल, थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

संबंधित पत्रव्यवहाराच्या आधारे त्या संदर्भात बँकेला नोटीस बजावण्यात आली होती. बँकेला कारणे दाखविण्यास सांगितले होते आणि सांगितलेल्या निर्देशांचे पालन न केल्याने बँकेला दंड का आकारण्यात येऊ नये, याबद्दल विचारणा करण्यात आली होती.

आरबीआयने म्हटले आहे की, नोटीसला बँकेचा प्रतिसाद, वैयक्तिक हजेरी दरम्यान दिलेले तोंडी उत्तर आणि त्यांनी दिलेली अतिरिक्त माहिती लक्षात घेतल्यानंतर असे आढळून आले की, इतर गोष्टींबरोबरच बँकेवरील आरोप सिद्ध झाले आहेत. ज्यासाठी आर्थिक दंड आकारणे आवश्यक होते.

HSBC बँकेला आरबीआयचा दणका, ठोठावला मोठा दंड; जाणून घ्या कारण?
Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजने'चा कोणाला घेता येणार लाभ, काय आहेत नियम-अटी? शासन निर्णयातून समोर आली माहिती

ग्राहकांना नाही बसणार फटका

आरबीआयने म्हटले आहे की, दंड वैधानिक आणि नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे. बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा हेतू नाही. आरबीआयने आर्थिक दंड ठोठावल्याने बँकेच्या इतर कोणत्याही कामावर याचा विपरीत परिणाम होणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com