LPG Cylinder Price Cut : खुशखबर! गॅस सिलिंडरच्या दरात कपात, जुलैच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट

Gas Cylinder Price News Today : जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे.
Gas Cylinder Price News Today
Gas Cylinder Price News TodaySaam TV

जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलं. तेल विपणन कंपन्यांनी पहाटे ६ वाजता गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर केले. त्यानुसार, एलपीजी सिलिंडर जवळपास ३१ रुपयांनी स्वस्त झाला आहे. आज पहाटेपासूनच नवीन दर लागू करण्यात आले आहेत. यामुळे महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

Gas Cylinder Price News Today
Petrol Diesel Price : खुशखबर! पेट्रोल-डिझेल तब्बल २० रुपयांनी स्वस्त होणार? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवीन दर जारी केले जातात. आजपासून जुलै महिना सुरू झाला असून पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली. १९ किलो वजनाचा व्यावसायिक सिलिंडर जवळपास ३० ते ३१ रुपयांनी स्वस्त झाला. त्यामुळे आता मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १५९८ रुपये इतकी झाली आहे.

तर दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर आता १६४६ रुपयांना मिळणार आहे. चेन्नईमध्ये आजपासून व्यावसायिक सिलिंडर १८४०.५० रुपयांऐवजी १८०९.५० रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३१ रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सिलिंडरचे दर १७५६ रुपये इतके झाले आहेत.

विशेष बाब म्हणजे, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सलग चौथ्या महिन्यात घट झाली आहे. या कालावधीत चारही महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर तब्बल १५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीत. ९ मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे थे आहेत.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत सर्वात कमी ८०२.५० रुपये इतकी आहे. तज्ज्ञांच्या मते, केंद्र सरकारने गेल्या १० महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत जवळपास ३०० रुपयांनी कपात केली आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल अपेक्षित नाही. दुसरीकडे, येत्या काही महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता आहे.

Gas Cylinder Price News Today
HDFC Bank Rule: मोठी बातमी! HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना बसणार मोठा फटका, ऑगस्टरपासून नियमात होणार मोठा बदल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com