Sambhajinagar News : विनापरवाना, जादा दराने कापूस बियाणे विक्री; २८ कृषी केंद्रांवर परवाना रद्दची कारवाई

Sambhajinagar News : यंदाच्या खरीप हंगामात जादा दराने कापूस बियाणे विक्री करणे, विनापरवाना बियाणे आणि खते विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांविरोधात कृषी विभागाने विविध ठिकाणी छापे मारून कारवाई केली
Agriculture Department
Agriculture DepartmentSaam tv

छत्रपती संभाजीनगर : खरीप हंगामाला सुरवात होण्याच्या अनुषंगाने कृषी विभागाकडून कृषी केंद्रावर नजर होती. तरी देखील कापसाचे बियाणे जादा दराने विक्री, विनापरवाना विक्री केली होत हाती. या प्रकार लक्षात आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कृषी विभागाने २८ कृषी केंद्रावर कारवाई केली आहे. 

Agriculture Department
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील खाजगी शाळांकडून आर्थिक लूट; गणवेश खरेदीसाठी एकाच दुकानाचे नाव

यंदाच्या खरीप हंगामात जादा दराने कापूस बियाणे विक्री करणे, विनापरवाना बियाणे आणि खते विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांविरोधात (Agriculture Department) कृषी विभागाने विविध ठिकाणी छापे मारून कारवाई केली. कृषी विभागाने तालुका, विभाग आणि जिल्हास्तरीय भरारी पथके स्थापन केले आहेत. या पथकांनी डमी ग्राहक पाठवून शेतकऱ्यांना (Farmer) लुटणाऱ्या कृषी सेवा केंद्रचालकांवर कारवाई केली. आतापर्यंत २८ कृषी सेवा केंद्र चालकांचे बियाणे विक्री परवाने कृषी विभागाने निलंबित केले आहेत. 

Agriculture Department
Onion Price : कांद्याचे दर तेजीत..साठवणूक केलेल्या कांद्याची बाजारात आवक

कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन 

कृषी बियाणे, रासायनिक खते, कीटनाशकांच्या काही तक्रारी असल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी (sambhajinagar) कार्यालयाशी थेट संपर्क साधून तक्रार करावी; असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com