Instagram: इन्स्टाग्राम युजर्संना मोठा झटका! १६ वर्षांखालील मुलांसाठी 'मेटा'ने बदलले नियम |VIDEO

Instagram New Rule: लहान वयात इन्स्टाग्राम वापरणाऱ्यांसाठी आता मेटाने काही नवीन नियम तयार केले आहेत. या मुलांना आता लाईव्ह स्ट्रीमिंग करता येणार नाहीये.
Instagram
InstagramSaam Tv
Published On

इन्स्टाग्रामवर (Instagram) असलेल्या १६ वर्षांखालील मुलांवर लाइव्ह करण्यास बंदी घालण्यात आलीय. मेटाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी नवे नियम लागू झाले आहेत. काय आहेत नवे नियम? जाणून घ्या सविस्तर

Instagram
Social Media: सोशल मीडियावर प्रेम फुललं, चंदनसाठी अमेरिकेची जॅकलीन भारतात आली; ऐश्वर्यापेक्षाही देखणी

इन्स्टाग्रामचा वापर करणांऱ्यांना झटका (Instagram New Rules)

१६ वर्षांखालील मुलांना पालकांची परवानगी नसल्यास इन्स्टाग्रामवर आता थेट लाइव्हस्ट्रीमिंग करता येणार नाही. तसेच नग्नतेशी संबंधित 'कंटेंट' त्यांना पालकांच्या परवानगीशिवाय पाहता किंवा पाठवताही येणार नाही.

फेसबुक, इन्स्टाग्रामची कंपनी असलेल्या 'मेटा'ने १८ वर्षांखालील वापरकर्त्यांची सुरक्षितता अधिक भक्कम करण्याच्या हेतूने हे बदल केलेत. सध्या अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया येथे हे बदल लागू करण्यात आले असून काही महिन्यांत ते जगभर अमलात येणार आहेत. याव्यतिरिक्त मेटाने सुरक्षेसंदर्भात काही उपाय केले आहेत. ते जाणून घ्या

  • सोशल मीडिया अकाऊंट खासगी ठेवणे

  • अनोळखी लोकांकडून येणारे संदेश ब्लॉक करणे

  • हिंसक आणि संवेदनशील दृश्यं नियंत्रित करणे

  • 60 मिनिटांनंतर अॅप बंद करण्याची आठवण करून देणे

  • रात्रीच्या वेळी नोटीफिकेशन थांबवण्यासारखी पावलं उचलण्यात येणार आहेत.

Instagram
आता तुम्ही WhatsApp वर पण पाहू शकता Instagram रील, जाणून घ्या नवीन ट्रिक

लाइव्ह स्ट्रीमिंगमुळे (Live Streaming) लहान मुलांवरील सायबर गुन्ह्यांचा धोका वाढत असल्याचं अनेक तज्ज्ञांचं म्हणणंय. अज्ञात व्यक्तींकडून होणारे कमेंट्स किंवा अनुचित वर्तन यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. इन्स्टाग्रामचा हा निर्णय काहींसाठी कठोर वाटत असला, तरी मुलांच्या सुरक्षेसाठी तो महत्त्वाचा ठरू शकतो.

Instagram
एक नंबर! WhatsApp वरून मिळणार आधार कार्ड, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com