एक नंबर! WhatsApp वरून मिळणार आधार कार्ड, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

WhatsApp: तुम्ही व्हॉट्सॲप वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मेटाने व्हॉट्सॲपवर एक कमालीचं फीचर आणलंय. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे आधार कार्ड कधीही मिळवून शकता.
Whats App
Whats App News Feature Saam Tv
Published On

तुमचं व्हॉट्सॲप आता अजून जास्त उपयोगी पडणार अ‍ॅप बनणार आहे, त्याचं कारण म्हणजे या अ‍ॅपवरून तुम्ही तुमचं आधार कार्ड कधीही मिळवू शकता. Meity ने काही वर्षांपूर्वी नागरिकांच्या सोयीसाठी DigiLocker सेवा सुरू केली होती. या डिजीलॉकरमध्ये कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवता येतात. आता व्हॉट्सॲपवरही अशीच सुविधा मिळणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून तुम्ही तुमचे आधार कार्ड कधीही डाउनलोड करू शकता.

WhatsApp वरून असं डाउनलोड करा आधार कार्ड

तुमच्या फोनमध्ये MyGov HelpDesk चा संपर्क नंबर +91-9013151515 हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सॲप कॉन्टॅक्ट लिस्ट रिफ्रेश करा.

आता MyGov हेल्पडेस्क सोबत तुमचे चॅट सुरू करा. यामध्ये तुम्ही नमस्ते किंवा हाय असा मेसेज लिहून पाठवू शकता.

चॅटबॉक्स तुम्हाला DigiLocker आणि Cowin सेवा यांमधील पर्याय निवडण्यास सांगेल.

Whats App
State Government: सरकारकडे काम आहे व्हॉट्सअ‍ॅप करा! Whats App वर मिळणार सरकारच्या ५०० सेवांचा लाभ

यात तुम्ही डिजीलॉकर सेवा निवडा. तुमचे डिजीलॉकर खाते आहे का? जर तुमचे खाते असेल 'होय' या पर्यायावर क्लिक करा.

जर तुमचे खाते नसेल तर डिजीलॉकर ॲप किंवा अधिकृत साइटवर जाऊन तुमचे खाते तयार करा.

यानंतर 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाका. नंबरची पडताळणी करण्यासाठी मोबाईलवर OTP येईल.

OTP टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या DigiLocker शी कनेक्ट केलेले सर्व कागदपत्रे दिसू लागतील.

Whats App
OYO Room किंवा हॉटेलमध्ये आधार कार्ड देण्यापूर्वी 'या' गोष्टी करा,नाहीतर...

आधार कार्ड पर्याय निवडण्यासाठी 1 अंक लिहा आणि सेव्ह केलेल्या नंबरवर पाठवा. यानंतर तुमचे आधार कार्ड पीडीएफ फॉरमॅटमध्ये येईल. या प्रक्रियेनंतर तुम्हाला आधार कार्ड मिळेल. तुम्ही आधार कार्डची PDF देखील सेव्ह करू शकता. तुम्ही डिजीलॉकरमध्ये स्टोअर केलेली सर्व कागदपत्रे व्हॉट्सअॅपवरून डाऊनलोड करू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्ही एका वेळी एकच डॉक्युमेंट डाउनलोड करू शकता.

Whats App
Baal Aadhaar card: नवजात बाळाचे आधार कार्ड कसं काढायचंय? प्रोसेस काय? वाचा एका क्लिकवर

आधार कार्ड हरवलंय?अशा पद्धतीने बनवा डिजिटल कॉपी

अनेक कामांसाठी आधार कार्डची गरज असते. शाळेपासून ते अगदी कोणत्याही सरकारी कामांसाठी आधार कार्ड हे गरजेचे असते. आधार कार्डवर प्रत्येकाचा युनिक १२ अंकी नंबर असतो. परंतु आधार कार्ड हरवल्यानंतर अनेकांना सरकारी कामे करण्यात अडथळा येत असतो. त्यामुळे तुम्ही डिजिटल पद्धतीनेदेखील आधार कार्ड मिळवू शकतात. आधार कार्डची पीडीएफ किंवा प्रिंट काढू शकतात.

यासाठी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.

त्यानंतर 'माय आधार' वर जा. त्यानंतर डाउनलोड आधारवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला १२ अंकी आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा कोड टाका.

मग तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून आधार कार्ड डाउनलोड करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com