Baal Aadhaar card: नवजात बाळाचे आधार कार्ड कसं काढायचंय? प्रोसेस काय? वाचा एका क्लिकवर

Baal Aadhaar Card Application Process: नवजात बाळासाठी तुम्हाला आधार कार्ड काढायचंय तर ही बातमी वाचा. नवजात बाळासाठी आधार कार्ड काढण्यासाठी अप्लाय कसं करावं? जाणून घ्या.
Baal Aadhaar card
Baal Aadhaar cardSaam Tv
Published On

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाचे ओळखपत्र आहे.आधार कार्ड हे प्रत्येक सरकारी कामांसाठी गरजेचे आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला आधार कार्ड बनवून घेणे अनिवार्य आहे. आधार कार्ड नसल्यास तुम्ही अनेक सरकारी योजनांपासून वंचित राहू शकतात.

सरकारी कामे तसेच पासपोर्ट बनवणे अशा सर्व कामांसाठी आधार कार्ड मह्त्तवाचे असते. परंतु नवजात बाळाचे आधार कार्ड कसे काढायचे?त्याची प्रोसेस काय? याबाबत अनेक प्रश्न पडलेले असतात. तर आज आम्ही तुम्हाला याबाबत सर्व माहिती देणार आहोत. (Baal Aadhaar Card)

Baal Aadhaar card
Aadhaar Card: आताच करा हे काम! आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी उरले फक्त ४ दिवस

कागदपत्रे (documents reguired for baal aadhaar card)

जर तुम्ही ५ वर्षांसाठी लहान बाळाचे आधार कार्ड काढत असाल तर त्याला बायोमॅट्रिकची गरज नाही. बाल आधार बनवण्यासाठी पालकांचे आधार कार्ड,बालकाची जन्मतारीख आणि जन्मदाखला गरजेचा आहे.

बाल आधार कार्डसाठी रजिस्ट्रेशन कसं करावं? (Baal aadhaar card registration process)

सर्वप्रथम तुम्ही यूआयडीएआय (UIDAI) वेबसाइटवर जा.

त्यानंतर तुम्ही भाषेचा पर्याय निवडा. त्यानंतर माय आधार वर जा. त्यानंतर तुम्हाला Book an Appointment वर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्राची अपॉइंटमेंट बुक करा.त्यानंतर ज्या तारखेला तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची आहे त्या दिवशी करा.

यानंतर तुम्हाला आधार कार्ड केंद्राला भेट द्यावी लागणार आहे.

Baal Aadhaar card
PF Rule: सेवानिवृत्तीआधी PF काढल्यास पेन्शन मिळणार का? काय आहे नियम?

आधार कार्ड केंद्राला भेट देताना पालकांचे आधार कार्ड आणि बायोमॅट्रिक्स सबमिट करायचे आहे.

यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे द्यावी लागणार आहे.

यानंतर तुमचे बाल आधार कार्ड दिलेल्या पत्त्यावर पाठवण्यात येईल. तसेच तुम्ही ऑनलाइनदेखील आधार कार्ड डाउनलोड करु शकतात.

Baal Aadhaar card
EDLI scheme: EDLI योजनेच्या कालावधीत तीन वर्षांची वाढ, असा घेता येणार लाभ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com