State Government: सरकारकडे काम आहे व्हॉट्सअ‍ॅप करा! Whats App वर मिळणार सरकारच्या ५०० सेवांचा लाभ

Government Services On Whatsapp: सामान्य माणसांसाठी नियमितपणे महत्त्वाच्या असणाऱ्या ५०० सेवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून मिळणार आहेत.
Government Services On Whatsapp
Government Services On Whatsappsaam tv
Published On

राज्य सरकारच्या तब्बल ५०० सेवा आता नागरिकांना त्यांच्या मोबाईल व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार आहेत. सरकारी सेवांसाठी आता सरकारी कार्यालयांची उंबरे झिजवण्याची गरज नसणार आहे. आपले सरकार या संकेतस्थळावरील ५०० सेवा व्हॉट्सअ‍ॅपवरून मिळणार आहेत. या नव्या सुविधेमुळे महाराष्ट्रात व्हॉट्सअ‍ॅप गव्हर्नन्स चा नवा अध्याय सुरू होणार असल्याचे प्रतिप्रादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.

मुंबई टेक वीक २०२५ हा आशियातील सर्वात मोठा एआय इव्हेंटला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर फडणवीस यांनी महत्त्वाच्या काररांची माहिती दिली. सामान्य माणसांसाठी नियमितपणे महत्त्वाच्या असणाऱ्या ५०० सेवा राज्य सरकारतर्फे आपले सरकार या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

Government Services On Whatsapp
Manoj jarange: अशा टायमाला शिंदेसाहेब पाहिजे होते, त्यांनी खपाखप तुरुंगात टाकलं असतं; जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

आता आपले सरकार चॅटबॉटच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून या सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय. चॅटबॉट मराठी , हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये सेवा देईल. तसेच नागरिक आपले सरकार या चॅटबॉटसोबत लिखित संदेश किंवा ध्वनिमुद्रित संदेश माध्यमातून संवाद साधू शकणार आहेत. राज्य सरकारच्या तब्बल ५०० सेवा आता व्हॉट्सअ‍ॅपवरून मिळणार आहेत.

Government Services On Whatsapp
Maharashtra Politics: मुंडे, कोकाटेंवर कारवाई होणार? कुणाचीही पर्वा करू नका, पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्र्यांना आदेश

कोणत्या सेवा मिळणार

वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, तात्पुरता रहिवाशी दाखला, ज्येष्ठ नागिरक प्रमाणपत्र, सांस्कृतीक कार्यक्रम परवाना, शेतकरी असल्याचा दाखला, नॉन-क्रीमिलेअर दाखला, जातीचे प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, दारिद्रयरेषे खाली असल्याचा दाखला, दुकान-आस्थापना नोंदणी, कारखाना नोंदणी, मोटार नोंदणी, दस्त नोंदणी, सहकारी संस्थाची नोंदणी, ध्वनिक्षेपक परवाना, सभा-संमेलन मिरवणूक परवाना, व्हॉट्सअ‍ॅपवरून मिळणार आहेत.

राज्य सरकारकडून महामंडळाकडून महानगरपालिका किंवा ग्राम पंचायतीकडून कागदपत्रे मिळवायची आहेत, तक्रार दाखल करायची आहे, बस तिकीट बूक करायचे आहे किंवा एखाद्या कामाचा पाठपुरावा करायचा आहे. तर कार्यालयांचे खेटे मारायची गरज नाहीये फक्त सरकारच्या एका विशिष्ट मोबाईल क्रमांकावर मेसेज करा आणि तुमचे काम पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com