Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! तब्बल इतक्या कोटींचा निधी मंजुर; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Budget 26,500 Crore Allocation for 2026 Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत काल अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा करण्यात आली. या योजनेसाठी २६,५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय

अर्थसंकल्पात २६,५०० कोटींची तरतूद

मागच्या वर्षीच्या तुलनेत निधीत २६ टक्क्यांची कपात

काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. लाडकी बहीण योजनेबाबतही महत्त्वाची माहिती दिली. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. या योजनेत भरीव तरतूद करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: ८६ लाख लाडक्या बहिणींना मिळाला नाही जानेवारीचा हप्ता; ₹१५०० न येण्यामागचं कारण काय?

लाडक्या बहि‍णींसाठी २६०० कोटींची तरतूद (Ladki Bahin Yojana 2600 Crore Allocate)

लाडकी बहीण योजनेत २०२६-२७ साठी २६,५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वर्षभरातील निधी लक्षात घेता ही तरतूद करण्यात आली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत निधीत २६ टक्क्यांनी कपात केली आहे. मागच्या वर्षी २०२५-२६ मध्ये लाडकी बहीण योजनेसाठी ३६,००० कोटींची तरतूद केली होती. यावर्षी ९,५०० रुपयांनी कमी तरतूद केली आहे.लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. त्यानुसार ही तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पीय कागदपत्रांनुसार, २०२६-२७ साठी योजनेअंतर्गत १.५३ कोटी महिला लाभ घेणार असल्याचे समोर आले आहे. पडताळणी केल्यानंतर अनेक महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहे. दर महिन्याला या महिलांना १,५०० रुपये दिले जातात. त्यामुळे १.५३ कोटी लाभार्थ्यांना वर्षासाठी अंदाजे २७,५४० कोटी रुपये लागतील. त्यामुळे हा २६,५०० कोटींचा निधी योग्य आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचा हप्ताही लांबणीवर? लाडक्या बहिणींना कधी मिळणार १५०० रुपये? काय आहे नवी अपडेट

२१०० रुपये मिळणार का? (Ladki Bahin Yojana 2100 Rupees Update)

लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये मिळणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्या तरी लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये दिले जाणार आहेत. २१०० रुपयांबाबत प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, तुमच्या मनातील सर्व इच्छा आम्ही पूर्ण करणार. त्यामुळे आता २१०० रुपयांची घोषणा कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹२१०० येणार? देवेंद्र फडणवीस आज मोठी घोषणा करण्याची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com